SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिवाळीत धो धो पाऊस? महाराष्ट्राच्या हवामानात भयानक बदल, भारतातील 21 राज्यांना हवामान खात्याचा अलर्ट

Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 2 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान ): 'अर्णब'नंतर आता आणखी एका वादळाचा धोका निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील हवामानातही मोठ्या बदलाचा अंदाज आहे. 21 राज्यांना IMD ने अलर्ट दिला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 01, 2026, 10:16 PM IST | Updated: Nov 01, 2026, 10:20 PM IST
Join

2 नोव्हेंबर 2026 उद्याचे हवामान : दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचं हळूहूळू चक्रीवादळात रुपांतर होत आहे.  त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. यानंतर हे वादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने पुढे सरकत जाईल. 2 नोव्हेंबरला हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळाला मुरासू असं नाव देण्यात आले आहे.'मुरासू'चा अर्थ नगारा असा आहे. महाराष्ट्रातील हवामानातही मोठ्या बदलाचा अंदाज.  महाराष्ट्रासह 21 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

2 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह 21 राज्यांना अलर्ट

आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे पूर्वेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळाचा इशारा देण्यात आला आहे. 4 राज्यांना गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.  महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, आसाम आणि सिक्कीम या 21 राज्यांना अलर्ट देण्यात आला आहे. 2 नोव्हेंबर रोजी  या 21 राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडू शकतो. ताशी 90 KM च्या वेगाने वारे वाहणार आहेत. 

महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट

नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी हवामानात बदल झाला आहे. महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट ओढावले आहे.  मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.  पुणे घाटमाथ्यासह पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे.  कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांतही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, कोकणातही पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

थंडीचं आगमन लांबलं 

IMDने शनिवारी जाहीर केलेल्या मासिक हवामान अंदाजानुसार, राज्यासह देशाच्या बहुतांश भागांमध्ये थंडीसाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे....नोव्हेंबरमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत विजांसह पावसाची शक्यता आहे. या महिन्यात मराठवाड्यात सरासरीइतके, तर राज्यात इतरत्र सरासरीपेक्षा जास्त किमान तापमानाची शक्यता आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES