SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

360 च्या मॅजिक फिगरजवळ मोदी सरकार! काँग्रेसला धक्का, इंडिया आघाडीच्या बाजूचे 2 पक्ष बदलणार सगळी समीकरणं?

मागील वेळेस ज्या पक्षांनी विरोध केला होता त्यापैकी एका पक्षात उभी फूट पडली असून अन्य दोन पक्ष तर आता सरळ सरळ सरकारच्या बाजूने उभे राहण्यास तयार असल्याचं चित्र दिसत आहे. नेमकी ही आकडेमोड काय ते पाहूयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 19, 2026, 06:49 IST | Updated: Nov 19, 2026, 07:24 IST
Image Credit: काँग्रेसला बसणार मोठा धक्का? (प्रातिनिधिक फोटो)
Join

केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या सरकारकडून मागील काही काळापासून सुरु असलेल्या प्रयत्नांना यश मिळत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. डिलिमीटेशन म्हणजेच लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेसंदर्भातील विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकारला दोन मोठ्या पक्षांचा पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यापैकी एक पक्ष शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असतानाच अन्य एका पक्षाच्या महिला खासदारानेही सूचक पद्धतीने या विधेयकाला पाठिंबा दर्शवण्याची तयारी दाखवली आहे.

दुसरा पक्ष कोणता?

शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काही अटी-शर्थींवर विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता 'द्रमुक'च्या नेत्या तसेच खासदार कनिमोळी यांनी देखील या विधेयकाबद्दल बोलताना, "लोकसभा मतदारसंघांची फेररचना सर्व राज्यांसाठी न्याय्य व समान संधी देणारी असावी" असं म्हटलं आहे. त्यामुळेच सदर घटनादुरूस्तीला 'द्रमुक' पाठिंबा देईल असं चित्र दिसत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आधीच काही अटी-शर्थींचा उल्लेख करत सकारात्मक भूमिका मांडली असल्याने इंडिया आघाडीच्या बाजूने असलेल्या या दोन पक्षांच्या लवचिक भूमिकेचा फायदा मोदी सरकारला होणार असून हे विधेयक या पाठिंब्याच्या जोरावर रेटून नेता येण्याची शक्यता वाढली आहे. 

राष्ट्रवादीची भूमिका काय?

प्रत्येक राज्यात लोकसभा मतदारसंघांची संख्या 50 टक्क्यांनी वाढवली तर विधेयकाला पाठिंबा देण्याची तयारी असल्याचे संकेत 'द्रमुक' व राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार या दोन्ही पक्षांनी दिले आहेत. सर्व राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा समान प्रमाणात 50 टक्क्यांनी वाढवल्या गेल्या तर विधेयकाला पक्षाचा तत्त्वतः पाठिंबा असेल, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. 

कनिमोळी काय म्हणाल्या?

'इंडिया' आघाडीपासून लांब गेलेल्या 'द्रमुक'ने घटनादुरुस्ती विधेयकाबाबत तडजोड करण्याची तयारी दाखवल्याचे बुधवारी स्पष्ट झालं आहे. घटनादुरुस्ती विधेयक पुन्हा संसदेत मांडल्यास पाठिंबा देणार का, या प्रश्नावर, नव्या विधेयकात नेमके कोणते बदल केले जातात, हे समजल्यानंतर पक्ष भूमिका स्पष्ट करेल, असे कनिमोळींनी
चेन्नईमध्ये पत्रकारांना सांगितले. त्यांनी घटनादुरुस्ती विधेयकाला थेट विरोध केलेला नाही. मात्र, केंद्र सरकारने या विधेयकासंदर्भात 'द्रमुक'शी चर्चा केलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

भाजपाने सुरु केली तयारी?

लोकसभा फेररचनेचे मतदारसंघांच्या घटनादुरुस्ती विधेयकासाठी संसदेचे विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भातील चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असली तरी प्रत्यक्ष केंद्र सरकारने यासंदर्भातील संदिग्धता कायम ठेवली आहे. मात्र, काँग्रेसने आपल्या खासदारांना पुढील दहा-बारा दिवसांत कधीही संसदेच्या कामकाजासंदर्भात दिल्लीत उपस्थित राहावे लागू शकते, हे लक्षात घेऊन प्रवास व कामाचे नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकार घटनादुरुस्ती विधेयकासाठी विशेष अधिवेशनाची किंवा नियमित हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने तयारी केल्याचे सांगितले जाते. मात्र गेल्या वेळी प्रमाणे काँग्रेसला विरोधकांची एकजूट करण्यात कितपत यश येईल याबद्दल द्रमुक व राष्ट्र‌वादी काँग्रेस-शरद पवार पक्षामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हे दोन्ही पक्ष विधेयकाला पाठिंबा देऊ शकतात, असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काही दिवसांपूर्वी सूचित केले होते. त्यामुळेच संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाऊ शकते किंवा हिवाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक पुन्हा मांडले जाऊ शकते असे सूतोवाचही या नेत्यांनी केले होते. कणिमोळी यांनी बुधवारी केलेल्या विधानामुळे या शक्यतेला अप्रत्यक्षपणे दुजोरा मिळाल्याचे मानले जात आहे.

काँग्रेपासून दूरच

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रण द्रमुकचे प्रमुख स्टॅलिन यांना दिले होते. राहुल गांधींनी त्यांना फोनही केला होता. मात्र त्यांनी फोन घेतला नाही. स्टॅलिन यांच्या स्वीय सहाय्यकाने स्टॅलिन यांच्या वतीने शुभेच्छा देणारे पत्र पाठवले. आपल्याला निमंत्रण होते पण पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकलो नाही, असे स्टॅलिन यांनी सांगितले. स्टॅलिन यांच्या काँग्रेसच्या कार्यक्रमापासून दूर राहण्याच्या निर्णयामुळे काँग्रेस व द्रमुक यांच्यातील दरी ही वाढल्याचे स्पष्ट झाले. गेला वेळी घटनादुरुस्ती विधेयक हाणून पाडण्यात काँग्रेस प्रमाणे द्रमुक व तृणमूल काँग्रेस तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची एकजूट कारणीभूत होती. यावेळी तृणमूलमध्ये फूट पडली आहे. इतर इतर दोन पक्ष विधेयकाच्या बाजूने मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस एकाकी पडण्याची शक्यता आहे.

360 ची मॅजिक फिगर

लोकसभेत 'एनडीए'चे 320 खासदार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे 8 तर 'द्रमुक'कडे 22 खासदार आहेत. तसेच, इतर पक्षांतील पाच खासदारांचा पाठिंबा मिळाला तर केंद्र सरकारकडे ३54 सदस्यांचे समर्थन मिळू शकते. हे घटनादुरुस्ती विधेयक संमत करण्यासाठी 360 सदस्यांचा पाठिंबा लागेल. त्यामुळे अन्य सहा खासदारांच्या पाठिंब्यासाठी केंद्र सरकारल कसरत करावी लागणार आहे. त्यामुळेच विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून संकेत दिले जात असले तरी, प्रत्यक्षात केंद्र सरकारने मात्र सावध पवित्रा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सहा खासदार सरकार आणणार कुठून हे निश्चित झाल्याशिवाय कोणताही ठोस निर्णय घेतला जाणार नाही असं सांगितलं जातं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES