SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

इंडिगोच्या विमानात 'या' कंपनीची पॉवरबँक नेण्यास बंदी, का घेण्यात आला असा निर्णय?

इंडिगोच्या विमानात पॉवरबैंकमुळे आग लागल्याच्या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने पॉवर बँकबाबत एक निर्णय घेतला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 15, 2026, 01:09 PM IST | Updated: Oct 15, 2026, 01:11 PM IST
Image Credit: aviation regulator DGCA
Join

इंडिगोच्या विमानात पॉवरबँकमुळे आग लागल्याच्या घटनेनंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक मोठा निर्णय घेतला आहे. डीजीसीएने 'MOBIKINS MK-PB-04' या विशिष्ट मॉडेलच्या पॉवरबँकवर भारतातून व भारतात येणाऱ्या किंवा देशांतर्गत उड्डाण करणाऱ्या सर्व विमानांमध्ये पूर्णपणे बंदी घातली आहे.

भारतात येणाऱ्या किंवा भारतातून जाणाऱ्या तसेच देशांतर्गत उड्डाणांमध्ये प्रवासी किंवा विमान कंपन्यांना ही पॉवरबँक नेता अथवा वाहतूक करता येणार नाही. 'डीजीसीए'ने यासंदर्भात विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत. 'डीजीसीए'चे महासंचालक वीर विक्रम यादव यांनी पॉवरबँकचे संबंधित मॉडेल विमानात नेण्यास तसेच मालवाहतुकीतून वाहून नेण्यास प्रतिबंध करण्याचे निर्देश दिले.

का घेण्यात आला असा निर्णय?

11 ऑक्टोबर 2026 रोजी दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानामध्ये या मॉडेलच्या पॉवरबँकला लागलेल्या आगीमुळं हे विमान आपत्कालीन स्थितीत उतरावे लागले होते. त्यामुळं हा नियम करण्यात आला आहे.

प्रवाशांना ही पॉवरबँक प्रवासी स्वतःच्या बॅगेत (हँडबॅगेत किंवा चेक-इन बॅगेत) तसेच विमानातील कार्गो (Cargo) द्वारेही नेण्यास मनाई आहे.  हा नियम फक्त 'MOBIKINS MK-PB-04' या विशिष्ट मॉडेलसाठी आहे; सर्व पॉवरबँकवर सरसकट बंदी नाही.

साधारणतः इतर पॉवरबँक फक्त हँडबॅगेत नेण्याची परवानगी आहे. चेक-इन बॅगेत ठेवण्यास मनाई असते.

विमानात पॉवरबँकबाबतचे महत्त्वाचे नियम कोणते?

फक्त केबिन बॅगेजमध्ये परवानगी: तुम्ही पॉवरबँक फक्त तुमच्यासोबत हातातील बॅगेत (Hand/Cabin Baggage) नेऊ शकता. ती चेक-इन सामानात (Checked-in Luggage) ठेवण्यास सक्त मनाई आहे.

प्रवासादरम्यान पॉवरबँकचा वापर करून मोबाईल किंवा इतर कोणतेही उपकरण चार्ज करण्यास पूर्णपणे बंदी आहे. तसेच विमानाच्या सीटवरील आउटलेटचा वापर करून स्वतः पॉवरबँक चार्ज करणेही प्रतिबंधित आहे.

क्षमता मर्यादा (Capacity Limit): साधारणपणे 100 Wh (वॅट-अवर) पेक्षा कमी क्षमता असलेल्या (सुमारे 27,000 mAh पर्यंतच्या) जास्तीत जास्त 2 पॉवरबँक नेण्याची परवानगी असते. त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी विमान कंपनीची पूर्वपरवानगी लागते.

ओव्हरहेड बिनमध्ये ठेवण्यास मनाई: पॉवरबँक विमानाच्या वरच्या सामानाच्या कप्प्यात  न ठेवता ती स्वतःजवळ किंवा सीटच्या खिशात (Seat ठेवावी लागते, जेणेकरून काही समस्या झाल्यास त्वरित लक्ष जाईल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES