रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर; 11लाख कर्मचाऱ्यांना 2009 कोटींचा बोनस
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठं दिवाळी गिफ्ट मिळाले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. 11लाख कर्मऱ्यांच्या 2009 कोटींचा बोनस जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांंना 78 दिवसांचा दिवाळी बोनस मिळणार आहे. 11लाख कर्मऱ्यांना या दिवाळी बोनसचा लाभ मिळणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसबाबत मोठा निर्णय झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांचा बोनस जाहीर झाला आहे. रेल्वे कर्माचाऱ्यांना 2009 कोटींचा बोनस मिळणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना सरकारने दिवाळी भेट दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या दिवाली बोनसची घोषणा केली.
रेल्वेच्या 11 लाख पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचा लाभ मिळणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस मंजूर झाला असून 11.40 लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनसचे पैसे जमा होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने बोनसला मंजुरी दिली.
रेल्वे कर्मचाऱ्यांना एकूण 2,009.61 कोटी रुपयांचा उत्पादकता आधारित बोनस (PLB) मिळणार आहे. सुमारे 11 लाख 40 हजार 770 रेल्वे कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार. पात्र कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस दिला जाणार आहे.
प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला जास्तीत जास्त 17,951 रुपये मिळणार आहेत. ट्रॅक मेंटेनर, लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्तर, तंत्रज्ञ आणि इतर गट ‘क’ कर्मचाऱ्यांचा यात समावेश. दुर्गापूजा आणि दसऱ्याच्या सणापूर्वी बोनस देण्याची परंपरा आहे. 2025-26 मध्ये रेल्वेने उत्कृष्ट कामगिरी केली. 1,670 दशलक्ष टन मालवाहतूक आणि सुमारे 741 कोटी प्रवाशांची वाहतूक केल्याची माहिती आहे.
पूर्वी अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी उत्पादकतेवर आधारित बोनसची गणना 7,000 ची वेतन मर्यादा आणि 78 दिवसांच्या पगारावर आधारित होती. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना कमाल वार्षिक बोनस 17,951 मिळतो. तथापि, इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर्स असोसिएशनने (IRTSA) बोनसची गणना करण्यासाठी वेतन मर्यादेत वाढ करण्याची मागणी केली होती. संघटनेने म्हटले आहे की, स्तर 2 आणि त्यावरील कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यासह (DA) वेतन मर्यादा 18,000 पर्यंत वाढवावी. याव्यतिरिक्त, कर्मचाऱ्यांच्या विविध वेतन स्तरांच्या आधारावर बोनसची गणना करावी, असेही त्यांनी सुचवले.