• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /EPFO ला ₹18160000000 कोटींचे नुकसान झाल्यानं खळबळ; पीएफचे ₹18000000000 बुडाले; काय परिणाम?

EPFO ला ₹18160000000 कोटींचे नुकसान झाल्यानं खळबळ; पीएफचे ₹18000000000 बुडाले; काय परिणाम?

रिलायन्स कॅपिटलमधील गुंतवणुकीमुळे EPFO ला 18160 कोटींचा फटका बसलाय. 2500 कोटींची गुंतवणूक, दिवाळखोरी प्रक्रिया आणि PF खातेदारांच्या पैशांवर काय परिणाम होणार? याबद्दल जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 21, 2026, 09:42 IST|Updated: Nov 21, 2026, 09:58 IST
joinshare
EPFO ला ₹18160000000 कोटींचे नुकसान झाल्यानं खळबळ; पीएफचे ₹18000000000 बुडाले; काय परिणाम?
Image Credit: ईपीएफओचं नुकसान

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

देशातील कोट्यवधी नोकरदारांच्या भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओला मोठा आर्थिक फटका बसलाय. रिलायन्स कॅपिटल लिमिटेडमध्ये केलेल्या गुंतवणुकीतील 1816.22 कोटी रुपये वसूल होण्याची शक्यता मावळलीय. कंपनीच्या दिवाळखोरी निवारण प्रक्रियेनंतर या थकबाकीची वसुली करण्यासाठी पुढील कायदेशीर मार्ग उपलब्ध नसल्याचे ईपीएफओच्या कायदेशीर सल्लागारांनी स्पष्ट केलंय. काय घडलंय नेमकं? याचा पीएफ खातेधारकांवर काय परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया.

2013-14 मध्ये गुंतवले होते 2500 कोटी रुपये

ईपीएफओने 2013 आणि 2014 या आर्थिक वर्षांत रिलायन्स कॅपिटलच्या सुरक्षित नॉन-कन्व्हर्टिबल डिबेंचर्समध्ये (NCD) 2500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक चार पोर्टफोलिओ व्यवस्थापकांच्या माध्यमातून करण्यात आली होती. कंपनीने ऑक्टोबर २०१९ पासून व्याज देणे बंद केले आणि पुढे मूळ रक्कम परत करण्याबाबतही थकबाकी निर्माण झाली. या गुंतवणुकीवर 808.67 कोटी रुपयांचे व्याज जमा झाले. त्यामुळे ईपीएफओचा एकूण दावा 3308.67 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. या गुंतवणुकीबाबत केंद्र सरकारने 2021 मध्ये संसदेतही माहिती दिली होती.

3308 कोटींच्या दाव्यातून मिळाले फक्त 1492 कोटी

रिलायन्स कॅपिटलविरोधात रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2021 मध्ये दिवाळखोरी निवारण प्रक्रिया सुरू केली. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण म्हणजेच एनसीएलटीने फेब्रुवारी 2024 मध्ये हिंदुजा समूहाशी संबंधित इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जचा निवारण आराखडा मंजूर केला. मार्च 2025 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेत ईपीएफओल 1492.45 कोटी रुपये परत मिळाले. उर्वरित 1007.55 कोटी रुपये मूळ गुंतवणुकीतील आणि 808.67 कोटी रुपये व्याजाचे असे एकूण 1816.22 कोटी रुपये वसूल झालेले नाहीत.

आता पैसे वसूल करण्याचा कायदेशीर मार्ग का बंद झाला?

दिवाळखोरी आणि नादारी संहिता म्हणजेच आयबीसी, 2016 मधील कलम 31 नुसार एनसीएलटीने मंजूर केलेला निवारण आराखडा संबंधित कंपनी आणि तिच्या कर्जदारांवर बंधनकारक असतो. आराखडा अंतिम झाल्यानंतर त्यात समाविष्ट नसलेल्या जुन्या दाव्यांसाठी स्वतंत्रपणे वसुलीची मागणी करणे कठीण होते. याच कायदेशीर तरतुदीमुळे ईपीएफओला उर्वरित रक्कम वसूल करण्यासाठी पुढील मार्ग नसल्याचे सल्लागारांनी म्हटले.

PF खातेदारांचे पैसे कापले जाणार का?

या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक पीएफ खात्यातून 1816 कोटी रुपये कापले जाणार नाहीत. ही रक्कम ईपीएफओच्या गुंतवणुकीतून वसूल न झालेली आहे; प्रत्येक सदस्याच्या खात्यातील थेट कपात नाही. दरम्यान ऑगस्ट 2026 मध्ये सीबीआयने रिलायन्स कॅपिटल आणि माजी अध्यक्ष अनिल अंबानी यांच्याविरोधात कथित आर्थिक गैरव्यवहार आणि ईपीएफओला झालेल्या नुकसानीप्रकरणी गुन्हा दाखल केला. या आरोपांची चौकशी सुरू असून आरोप सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातून ईपीएफओच्या गुंतवणूक व्यवस्थापनातील जोखीम नियंत्रण आणि जबाबदारीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
EPFO
PF
india