• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /जम्मूमधील कठुआमध्ये CISF जवानांमध्येच गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

जम्मूमधील कठुआमध्ये CISF जवानांमध्येच गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात झालेल्या सीआयएसएफ कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या गोळीबारात चार जवान शहीद झाले आहेत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला.

Reported ByShivraj Yadav
Published: Sep 29, 2026, 10:00 PM IST|Updated: Sep 29, 2026, 10:03 PM IST
joinshare
जम्मूमधील कठुआमध्ये CISF जवानांमध्येच गोळीबार; चार जवानांचा मृत्यू

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

2

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीने उधळला गुलाल! किरण सरनाईक यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

3

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

4

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

5

20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात सीआयएसएफ कर्मचाऱ्यांदरम्यान झालेल्या गोळीबारात 4 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये एका असिस्टंट कमांडंट आणि एका इन्स्पेक्टरचा समावेश आहे. ही घटना बसोहलीच्या माश्का भागातील सेवा पॉवर प्रोजेक्ट येथील सीआयएसएफ कॅम्पमध्ये घडली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला.

ही घटना जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर भागातील माश्का परिसरात घडली. सूत्रांनुसार, माश्का भागातील सेवा पॉवर प्रोजेक्टमध्ये तैनात असलेल्या सीआयएसएफ जवानांमधील वाद विकोपाला जाऊन त्याचे रूपांतर रक्तरंजित चकमकीत झाले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीआयएसएफ जवानांमधील वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि त्यानंतर कॅम्पमध्ये गोळीबार झाला.

हे सीआयएसएफ जवान हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या बसोहली येथील माश्का गावातील सेवा-3 पॉवर प्रोजेक्टचे रक्षण करत होते. दोन जवानांमध्ये वाद झाला आणि एकाने अंदाधुंद गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

जवानांची ओळख पटली

या घटनेत असिस्टंट कमांडंट आणि सब-इन्स्पेक्टर यांच्यासह सीआयएसएफचे चार जवान शहीद झाले. मृत जवानांची ओळख असिस्टंट कमांडंट अंकित कुमार पांडे, सब-इन्स्पेक्टर लक्ष्मण सिंग, कॉन्स्टेबल रफीक अहमद आणि कॉन्स्टेबल संदीप कुमार अशी पटली आहे.

गोळीबारात सर्व जवान सुरुवातीला जखमी झाले होते आणि त्यांना हिमाचल प्रदेशच्या बाजूला असलेल्या एनएचपीसी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे नंतर त्यांचा मृत्यू झाला. सीआयएसएफ मुख्यालयाने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी गोळीबार झाला तो परिसर हिमाचल प्रदेशच्या सीमेजवळ आहे.

Add Zee News as a Preferred Source