सोनं तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त! दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश, पहिल्यांदाच असं घडलंय
दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश झाले आहे. भारतात सोनं तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे.
Gold Market Crash : मागील महिन्याभरापासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. अशातच दिवाळीच्या तोंडावर गोल्ड मार्केट क्रॅश झाले आहे. सोनं 2026 मधील उच्चांकी दरापासून तब्बल 43,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने गुंकवणूकदार धास्तावले आहेत. तर, सर्वसामन्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर आणखी घसरण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया 3 नोव्हेंबरला दिवसाच्या शेवटी सोन्याचा दर किती रुपयांवर स्थिरावला.
ऑक्टोबर 2026 या एका महिन्यात सोन्याच्या दरात 7 टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. 2 नोव्हेंबर रोजी मुंबई स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1.37 लाख रुपयांपर्यंत घसरला. एका महिन्यापूर्वी सोन्याचा दर 1.48 लाखावर होता. 29 जानेवारी 2026 सोन्याचे 2026 मधील सर्वात उच्चांकी दर गाठला होता. सोन्याचा दर 1.80 लाखाच्या वर गेला होता. यामुळे सराफा बाजारात खळबळ माजली होती. अशातच आत्ताच्या दराशी तुलना करता सोनं तब्बल 43,00 रुपयांची स्वस्त झाले आहे.
दिवाळीपूर्वी ग्राहकांना मोठा दिलासा
सोन्याचा दर 1,980 पर्यंत घसरला आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये सोन्याचा दर 1.38 लाखांपर्यंत खाली आला आहे.
दिवाळीच्या आधी सोनं स्वस्त झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्वेसर्सच्या दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे. लोक लग्नसराईसाठी आगाऊ ऑर्डरही देत आहेत. सोन्याच्या दरात घट झाली असूनही, गेल्या आठवड्यात खरेदी वाढली आहे.
सोन्याचा दर का घसरत आहेत?
जागतिक घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर होत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील ताव वाढत आहे. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे सोन्याच्या दरावर दबाव येत आहे. दुसरीकडे चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी, जगभरातील मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवू शकतात. व्याजदरवाढीची शक्यता सोन्यासाठी नकारात्मक मानली जाते. ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत 6.8 टक्क्यांनी घसरण झाली.