SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्या-चांदीच्या दरात मोठे उलटफेर, दागिने खरेदीपूर्वी वाचा 24 कॅरेटचा भाव

आज गुरुवारी सोनं-चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज चांदीची किंमत किती असेल, वाचा दर

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 26, 2026, 11:27 IST | Updated: Nov 26, 2026, 11:35 IST
Image Credit: Gold Silver Rate Change after big crash check check 24k 22k 18 carat live updates silver price
Join

गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली आहे. कालच्या मोठ्या घसरणीनंतर सोन्याचे दर एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर आले होते. मात्र आज सोन्याच्या दरांत मोठे उलटफेर झाले आहेत. आज मुंबईसह महाराष्ट्रात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCXवर सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे.

गुरुवारी एमसीएक्सवर फ्युचर्स ट्रेडिंग सुरू होताच, 4 डिसेंबरचे वायदे सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.22 लाख रुपयांवर होता. आदल्या दिवशी या सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1.21 लाख रुपयांपर्यंत घसरला होता. त्यात 1 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. त्यामुळं आज सोन्याचा वायदा 1600 रुपयांनी वाढून 1,22,769 रुपयांवर स्थिरावला आहे.

दरम्यान, जानेवारी 2026मध्ये सोन्याच्या दरांत उच्चांकी वाढ झाली होती. मात्र गेल्या काहि दिवसांपासून सोन्याच्या दरात होणाऱ्या घसरणींमुळं सोनं 51,700 रुपयांनी घसरले आहे. तर, नोव्हेंबर महिन्यातच तब्बल 13 टक्के इतकी घट झाली आहे.आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 12,589 रुपये इतका आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 11,540 रुपये प्रति ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 9,442 रुपये प्रति ग्रॅमवर स्थिरावली आहे.

सोन्याच्या दराने उसळी घेतल्यानंतर आता चांदीच्या दरातही किंचित वाढ झाली आहे. आज चांदी प्रतिग्रॅम 165 रुपये असून 1,65,000 रुपये प्रति किलोइतकी आहे. आज चांदीच्या दरांनी अचानक 3 टक्के इतकी वाढ झाली आहे.

गुरुवारी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ झाली असली तरी, त्यांच्या किमती उच्चांकापेक्षा खूपच खाली आहेत. वायदे बाजारात चांदीचा भाव 29  जानेवारीच्या 4,20,048 रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा प्रति किलोग्राम सुमारे 2.63 लाख रुपयांनी कमी आहे, तर सोन्याचा भावही 1.93 लाख रुपयांच्या उच्चांकापेक्षा प्रति 10  ग्रॅम सुमारे 70,000 रुपयांनी कमी आहे.

<caption>सोन्याचे दर</caption>
ग्रॅम24K22K18K
112,58911,5409,442
81,00,71292,32075,536
101,25,8901,15,40094,420
Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES