SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सिंगापूरमध्ये राहणारा भारतीय भाच्याच्या लग्नासाठी भारतात आला आणि जीव गमावून बसला

फरीदाबादमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. सिंगापूरमधून आलेल्या एका भारतीयाची हत्या झाली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 07, 2026, 11:59 PM IST | Updated: Nov 08, 2026, 12:06 AM IST
Join

क्राईम न्यूज :  सिंगापूरमध्ये राहणारा भारतीय भाच्याच्या लग्नसाठी भारतात आला आणि त्याची हत्या झाली आगे. शेजाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातून त्याची गोळ्या जाडून हत्या करण्यात आली आहे. फरीदाबादमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

फरीदाबादमधील सेक्टर 21 सी येथे शुक्रवारी रात्री पार्किंगच्या वादातून मल्टी नॅशनल कंपनी फपीटी सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेड’ मध्ये ज्येष्ठ उपाध्यक्ष  परमजीत धनखड यांची त्यांच्या शेजाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली.  परमजीत धनखड हे सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते आणि सध्या ते व्हिएतनाम येथे मुख्यालय असलेल्या ‘एफपीटी सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेड’ मध्ये ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन शर्मा असे नाव असलेल्या संशयित आरोपीने आपली परवानाधारक पिस्तूल काढून धनखड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याने सुमारे 15 गोळ्या झाडल्या, ज्यातील नऊ गोळ्या धनखड यांना लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पीडिताचा मुलगा शौर्य धनखड याच्या तक्रारीवरून शनिवारी सुरजकुंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) (खून) आणि आर्म्स ॲक्ट (शस्त्र कायदा) अन्वये एफआयआर (गुन्हा) दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे.

एकाच चार मजली इमारतीत राहणाऱ्या या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पार्किंग आणि पार्किंगच्या जागेत कुत्र्याला शौचास बसवण्यावरून वाद सुरू होता. धनखड हे तळमजल्यावर राहायचे, तर आरोपी दुसऱ्या मजल्यावर राहायचा, अशी माहिती तपासकर्त्यांनी दिली. शर्मा यांचा मुलगा त्यांच्या कुत्र्याला पार्किंगच्या जागेत शौचास बसवायचा, ज्यावर धनखड यांच्या कुटुंबाने वारंवार आक्षेप घेतला होता. या मतभेदांमुळे गेल्या काही दिवसांत त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते, ज्यात चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या वादाचाही समावेश होता.  परमजीत सिंगापूरमध्ये राहत होता आणि दोन दिवसांपूर्वी त्याच्या भाच्याच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी परत आला होता.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES