SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दिवाळी गिफ्टमध्ये मिळाली Kia sonet कार; सर्वात महागडं गिफ्ट देणाऱ्या कंपनीचे नाव जाणून शॉक व्हाल

एका कंपनीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून Kia sonet कार मिळाली आहे. दिवाळी गिफ्टमध्ये कार देणाऱ्या मालकाचे सर्वचजण कौतुक करत आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 28, 2026, 09:30 PM IST | Updated: Oct 28, 2026, 09:38 PM IST
Join

Diwali Gift : दिवाळी जवळ आली सर्वच ऑफिसमध्ये एकच चर्चा असते ती म्हणजे दिवाळी गिफ्ट काय मिळाले. अनके कंपन्या दिवाळी फिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना मिठाई, चॉकलेट किंवा ड्राय फ्रूट देतात. तर, काही कंपन्या  शोभेच्या वस्तू, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट म्हणून देतात. मात्र, भारतातील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना  Kia sonet कार दिवाळी गिफ्ट म्हणून दिली आहे. Kia sonet कार कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून दिली. कर्मचाऱ्यांना कार शो रुममध्ये जाऊन आपले दिवाळी गिफ्ट घ्यावे लागले. 

सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.  हरियाणातील एका कंपनीने दिवाळीपूर्वी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना किया सोनेट कार भेट देऊन आश्चर्यचकित केले. एमआयटीएस हेल्थकेअर असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीच्या चार मेहनती कर्मचाऱ्यांना हे दिवाळी गिफ्ट देण्यात आले आहे.

मिट्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने  आपल्या  mitshealthcarepvtltd  सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल जाले आहेत. 
एका शो रुममध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट देण्यात आले. कंपनीचे CEO आणि संस्थापक अध्यक्ष एम. के. भाटिया यांनी  कर्मचाऱ्यांना कारच्या चाव्या दिल्या. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नितीन, निर्मल, व्हीनस आणि गुरवीर या चार कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे. 

मेहनतीचं फळं Kia sonet कार

दिवाळी गिफ्ट देताना कारच्या शो रुममध्ये कंपनीचा मालक देखील उपस्थित होता. यावेळी केक कापून याचे जंगी सेलिब्रेशन देखील करण्यात आले. हे तुमच्या  मेहनतीचं फळं आहे असं म्हणत मालकाने कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या हातात Kia sonet कारच्या चाव्या दिल्या. 

सोशल मिडियावर बॉसचे कौतुक

कर्मचाऱ्यांना Kia sonet कार गिफ्ट म्हणून देणाऱ्या या बॉसचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कंपनी कुठे आहे? या कंपनीत जॉबसाठी अप्लाय कसा करायचं? असे प्रश्न कमेंटमध्ये विचारले आहेत. असा बॉस आम्हाला पण मिळू दे अशी कमेंट काही जणांनी केली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES