SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

राजस्थानच्या कोटा येथे झालेल्या भीषण अपघातात महाराष्ट्रातील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा भाविक जखमी झाले आहेत.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 22, 2026, 09:00 IST | Updated: Nov 22, 2026, 09:03 IST
Image Credit: kota road accident tempo traveller truck collision 9 dead khatu shyam
Join

राजस्थानच्या कोटा येथे झालेल्या भीषण अपघातात 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर येतेय. मिळालेल्या माहितीनुसार, एका टेम्पो ट्रॅव्हलरची बाजूलाच उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने हा अपघात झाला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. खाटू श्याम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर ओढावलेल्या या प्रसंगाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातात मृत्यू झालेले सर्व भाविक महाराष्ट्रातील असल्याचे समोर येतेय.  

सीकर जिल्ह्यातील खाटू श्यामजी मंदिराला भेट देऊन भाविकमहाराष्ट्रात परतत असताना ही घटना घडली. अपघात कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला क्रूझरची धडक बसल्याने मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला.   खाटू श्यामजी येथून परत येत असलेले हे सर्व भाविक एकाच कुटुंबातील सदस्य होते. या अपघातात इतर सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शंभूपुरा गावाजवळ घडला.

रविवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कोटा-उदयपूर महामार्गावरील शंभूपुरा गावाजवळ त्यांची क्रूझर गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की, क्रूझर गाडी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि त्यातील प्रवाशांना सावरण्याची संधीही मिळाली नाही आणि 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. महाराष्ट्रातील धुळे येथील तीन कुटुंबे स्वतंत्र वाहनांतून खाटू श्यामजींच्या दर्शनासाठी गेली होती. चालकाच्या झोपेमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे.

'आम्ही खाटू श्यामला गेलो होतो आणि जयपूरमार्गे परत येत होतो. आमच्याकडे तीन गाड्या होत्या आणि आम्ही जयपूरच्या आधी जेवणासाठी थांबलो होतो. जेवण झाल्यावर, ज्या गाडीचा अपघात झाला होती ती आधी निघाली, तर आम्ही नंतर निघालो,' अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

पुढे तो म्हणाला की, 'रस्त्यात आम्हाला फोन आला की अपघात झालाय. मग आम्ही लगेचच तिथे निघालो. जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघातात पाच ते सहा जण जखमी झाले असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.'

राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील कोटा-उदयपूर महामार्गावर शंभूपुरा जवळ भाविकांना घेऊन जाणारे वाहन एका उभ्या असलेल्या ट्रकला धडकले. या दुर्घटनेत सुमारे नऊ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अतिरिक्त जिल्हा कलेक्टर राजेश जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीपमध्ये साधारण 16 जण होते. खाटू श्यामचं दर्शन करुन सर्वजण महाराष्ट्रात परतत होते. मध्यरात्री हा अपघात घडला आहे. तर, जीपमधील सर्व भाविक एकाच कुटुंबातील होते.

प्रशासनाची पहिली प्राथमिकता गंभीर जखमी असलेल्या लोकांचा जीव वाचवणे हे आहे. अपघातात जीव गमावलेल्या लोकांचा पोस्टमार्टम करण्यात येईल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES