SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

लालकृष्ण अडवाणी रुग्णालयात दाखल! अपोलो रुग्णालयाने जारी केलं स्टेटमेंट; अडवणींना झालंय काय? रुग्णालयाने काय माहिती दिली?

लालकृष्ण अडवाणी हे 98 वर्षांचे आहेत. 7 ऑक्टोबर रोजी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अडवाणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. वर्ष 2024 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 17, 2026, 01:18 PM IST | Updated: Oct 17, 2026, 01:43 PM IST
Image Credit: शुक्रवारी रात्री रुग्णालयात करण्यात आलं दाखल (प्रातिनिधिक फोटो)
Join

भारताचे माजी उपपंतप्रधान तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना शुक्रवारी रात्री दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या प्रकृतीसंदर्भात रुग्णालयाने एक पत्रक जारी केलं आहे. त्यांना नेमकं झालंय काय? त्यांच्यावर कोणते डॉक्टर उपचार करत आहेत याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

कोणत्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय?

98 वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांना शुक्रवारी 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास इंद्रप्रस्थ येथील अपोलो रुग्णालयात आणण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंद्रप्रस्थ येथील अपोलो रुग्णालयात सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांकडून त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. अडवाणींच्या प्रकृतीसंदर्भात रुग्णालयाने एक स्टेटमेंट जारी केलंय.

स्टेटमेंटमध्ये काय म्हटलंय रुग्णलयाने? अडवाणींना झालंय काय?

प्रसारमाध्यमांसाठी अपोलो रुग्णालयाने मोजून तीन शब्दांचं स्टेटमेंट जारी केलं आहे. यामध्ये, "लालकृष्ण अडवाणी यांना छातीत संसर्ग (चेस्ट इन्फेक्शन) झाल्यामुळे अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ते सध्या अतिदक्षता विभागात (आयीसूमध्ये) असून, वरिष्ठ न्यूरोलॉजी सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून, ते वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत," असं रुग्णालयाने सांगितलं आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री रुग्णालयात पोहोचले

शुक्रवारी रात्रीच्या प्राथमिक तपासणीनंतर त्यांना रुग्णालयाच्या फुफ्फुसविकार विभागात दाखल करण्यात आले.  न्यूरोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. विनीत सुरी यांच्या बरोबरच श्वसनविकार तज्ज्ञांच्या विशेष पथकाची टीम त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. अडवाणी रुग्णालयात दाखल झाल्याचे समजताच केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी अपोलो रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

वैद्यकीय चाचण्या

अपोलो रुग्णालयाने यापूर्वी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये अडवाणींच्या वयाचा संदर्भ देण्यात आला आहे. अडवाणी यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि सध्या काळजी करण्याचे कारण नाही. वाढते वय लक्षात घेता त्यांच्या आवश्यक वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत, असं रुग्णालयाने स्पष्ट केलेलं. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES