SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हिमालयीन प्रदेशातील 3 लाख लोकांचा जीव धोक्यात? कारण जाणून शॉक व्हाल; धक्कादायक अहवालात मोठा खुलासा

हिमालयीन प्रदेशातील 3 लाख लोकांचा जीव धोक्यात असल्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. झोप उडवणारा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात संभाव्य धोक्याचे कारण देकील नमूद करण्यात आले आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 01, 2026, 11:05 PM IST | Updated: Nov 01, 2026, 11:11 PM IST
Join

हिमालय : पृथ्वीचं स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  हिमालयीन प्रदेशावर सध्या एक मोठं संकट घोंघावत आहे. यामुळे हिमालयीन प्रदेशात राहणाऱ्या 3 लाख लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. 'सायंटिफिक रिपोर्ट्स' या जर्नलमध्ये एक अवहाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात हिमालयीन प्रदेशातील स्थितीबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. या ठिकाणी कधीही मोठं विनाशकारी नैसर्गिक संकटर निर्माण होऊ शकते असा इशारा या अहवालात देण्यात आला आहे. या नैसर्गिक संकटामागची कारणे देखील अत्यंत चिंताजनक आहेत.  

बर्फाच्छदित डोंगर रांगा आणि अप्रतिम निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी लाखो पर्यटक येथे पर्यटनासाठी येतात. यामुळे येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे देखील केली जात आहे. हिमालयीन प्रदेशातील अनियंत्रित आणि झपाट्याने वाढणाऱ्या बांधकामांमुळे पर्वतीय परिसंस्था गंभीर धोक्यात आली असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. वाढत्या बांधकामामुळे  हिमालयीन प्रदेशातील 3 लाख लोकांचा जीव धोक्यात आला आहे. 
 

'सायंटिफिक रिपोर्ट्स' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अवहालाने सर्वांची झोप उडवली आहे.  या अहवालात हिमालयीन प्रदेशात झालेल्या बांधकांमाची आकडेवारी देण्यात आली आहे. 2016 ते 2023 दरम्यान उत्तर नेपाळ, आग्नेय तिबेट आणि भारतातील उत्तराखंडमधील संवेदनशील भागांमध्ये बांधकामात 45 टक्के वाढ झाली आहे. हिमनदीच्या सरोवरांच्या उद्रेकाचा धोका असलेल्या भागांमध्ये तर 78 टक्के बांधकाम झाले आहे.  ब्रिटन, नेपाळ आणि भारतातील 9 संशोधकांच्या एका पथकाने हा अहवाल तयार केला. संशोधकांनी  हिमालयातील नद्यांच्या प्रवाहाच्या दिशेने 50 किलोमीटरपर्यंत तसेच 1,360 हिमनदी सरोवरांमधील रचनांचे सखोल विश्लेषण केले. नियमांचे उल्लंघन करून संवेदनशील भागांमध्ये हॉटेल्स, रिसॉर्ट्स, रिअल इस्टेट आणि मोठे पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात असल्याची धक्कादायक माहिती या अहवालात समोर आली आहे. वाढत्या बांधकामुळे मोठं नैसर्गिक संकट ओढावू शकते. यामुळे 3 लाख लोकांना धोका निर्माण होऊ शकतो. 

ऑगस्ट 2026  नेपाळमध्ये महाप्रलय आला होता. यापूर्वीच हे संशोधन पूर्ण झाले होते. नेपाळच्या महाप्रलयात 1,400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हजारो लोक बेपत्ता झाले. 11 ऑक्टोबर रोजी बुढी गंडकी नदीला आलेल्या अचानक आलेल्या पुरामुळे 200 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली. 5 पाच महत्त्वाचे पूल वाहून गेले. संवेदनशील उंच भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि मोठ्या प्रमाणात खडक कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

नेपाळसह भारतातील कोणत्या प्रदेशांना धोका

उत्तराखंडमध्ये असुरक्षित नदीकिनारी आणि अरुंद पर्वतीय खोऱ्यांमध्ये घरे, हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापने बांधण्यात आली आहेत. पूरप्रवण आणि भूस्खलनप्रवण भागांमधील अनियोजित बांधकामाबद्दल तज्ज्ञांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीचा सर्वात पहिला फटका यांना बसू शकतो. 

उत्तर नेपाळमध्ये देखील नदीकिनारी अनियंत्रित वस्त्या निर्माण झाल्या आहेत.  पर्यटन सुविधा विकसित झाल्या आहेत. पोखरा, अन्नपूर्णा प्रदेश आणि बुढी गंडकी, त्रिशुली व मोदी नद्यांच्या काठावरील भागांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

आग्नेय तिबेटमध्ये, हिमनदीच्या सरोवरांजवळ आणि हिमालयीन नद्यांजवळ असलेल्या भागांमध्ये अचानक पूर येण्याचा धोका वाढला आहे. हिमालयीन प्रदेशातील तलावांच्या सभोवतालचा परिसर अत्यंत असुरक्षित आहे. तापमानवाढ किंवा भूस्खलनामुळे या तलावांना पूर आल्यास खालच्या बाजूच्या भागांमध्ये प्रचंड विध्वंस होऊ शकतो. वाढती बांधकामे तातडीने रोखणे अत्यंत गरजेचे आहे.   या संवेदनशील खोऱ्यांमध्ये वेळेवर कठोर उपाययोजना न केल्यास भविष्यात जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ शकते. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES