दिवाळीपूर्वी महाग झाला LPG गॅस सिलेंडर, इतक्या रुपयांनी वाढल्या किंमती, जाणून घ्या आजच्या घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमती
LPG Gas Cylinder Rates : 1 नोव्हेंबर 2026 रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. तेव्हा आजच्या ताज्या LPG गॅस सिलेंडरच्या किंमती जाणून घेऊयात.
LPG Gas Cylinder Rates : दिवाळी सणाला आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे घरोघरी फराळ बनवण्याचं काम जोरात सुरु आहे. तर हॉटेल आणि मिठाई दुकानदार सुद्धा सणासुदीनिमित्त खाद्यपदार्थांची निर्मिती करत आहेत. अशातच आता 1 नोव्हेंबर 2026 रोजी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. देशात 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत प्रति सिलेंडर 10 ते 11.50 रुपये वाढ झालेली आहे. तर सणासुदीच्या निमित्ताने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झालेली नाही. सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या ताज्या किंमती जाहीर केल्या आहेत.
दिल्लीतील व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमती :
राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता 2,820 रुपये झाली आहे. याआधी ऑक्टोबर महिन्यात याची किंमत 2,810 रुपये होती. याचा अर्थ असा की, दिल्लीत हा सिलिंडर 10 रुपयांनी महाग झाला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीतही वाढ करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीत ही किंमत 62.50 रुपयांनी वाढवण्यात आली होती. मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता.
चेन्नईत सर्वात जास्त वाढल्या किंमती :
चेन्नईमध्ये, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत ₹2,983 वरून वाढून ₹2,994.50 झाली आहे. म्हणजेच यात ₹11.50 ची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ₹957.50 इतकीच कायम आहे.
हेही वाचा : मुंबईत CNG च्या दरात वाढ, आता मोजावे लागणार इतके पैसे; जाणून घ्या आजच्या पेट्रोल- डिझेल आणि CNG च्या किंमती
मुंबईमध्ये व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरच्या किंमती :
मुंबईमध्ये 19 किलोग्रामच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 2,764 रुपयांची वाढ झाली आहे. येथे घरगुती सिलिंडरची किंमत 941.50 रुपयांवर स्थिर आहे. अहमदाबादमध्ये, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 2,831.50 रुपयांवरून वाढून 2,842 रुपये झाली आहे. म्हणजेच यात 10.50 रुपयांची वाढ झाली आहे. घरगुती सिलिंडरची किंमत 949 रुपयांवर कायम आहे.