बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या अकवान चक्रीवादळामुळं 11 राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पुढील चार आठवडे हा पाऊस राहू शकतो, असा अंदाजही हवामान विभागाने सांगितला आहे. अकवान चक्रीवादळ आज शुक्रवारी दुपारी आंध्र प्रदेशच्या नरसापूर आणि ओडिसाच्या पुरी समुद्र किनाऱ्यादरम्यान धडकणार आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अकवान चक्रीवादळ उत्तर-पश्चिम दिशेकडे वेगाने सरकत आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी 20 नोव्हेंबरला दुपारी नरसापूर आणि पुरीच्या काही किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे. अकवान चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रातही होण्याची शक्यता आहे. पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार असून कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे.
अकवान चक्रीवादळ 15 किमी प्रति तास या वेगाने पुढे सरकतय. सध्या चक्रीवादळ उत्तर-पश्चिमेकडे वेगाने सरकतंय. वादळ धडकण्याच्या दरम्यान वाऱ्याचा वेग 90-100 किमी प्रति तास इतका असेल. तसंच, वादळी वारे 110 किमी प्रति तास या वेगानेही वाऱ्याचा झोत येण्याचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात 0.5 ते 1 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
'अकवान' चक्रीवादळामुळे 8 राज्यांमध्ये पुढील चार आठवड्यांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. विशेषतः ओडिशा, पश्चिम बंगाल, दक्षिण भारत आणि महाराष्ट्रातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. 19 ते 26 नोव्हेंबर दरम्यान ओडिशा व
गंगा नदीचे प. बंगाल खोरे, केरळ, तामिळनाडू, झारखंड, आसाम. येथे पाऊस होईल.
26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर : केरळ,
तामिळनाडू, द. कर्नाटकातील काही भाग व आंध्र प्रदेश.
3 ते 10 डिसेंबर : द. भारत,
कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल.
10 ते 17 डिसेंबर : तामिळनाडू,
केरळ, कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश.