• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्राकडून PUC नियमात मोठा बदल; थेट तुमच्यावर काय परिणाम?

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्राकडून PUC नियमात मोठा बदल; थेट तुमच्यावर काय परिणाम?

केंद्र सरकारने पीयूसी प्रमाणपत्राच्या वैधतेत बदल केला. सहा वर्षांपर्यंतच्या BS-6 खासगी वाहनांना तीन वर्षांची मुदत देण्यात आलीय. व्यावसायिक आणि जुन्या वाहनांसाठी काय नियम आहेत? जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 20, 2026, 08:15 IST|Updated: Nov 20, 2026, 08:28 IST
joinshare
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! केंद्राकडून PUC नियमात मोठा बदल; थेट तुमच्यावर काय परिणाम?
Image Credit: पीयूसी नियम

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येतेय. केंद्र सरकारने वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या म्हणजेच पीयूसी वैधतेच्या नियमांत बदल केलाय. नव्या नियमानुसार, सहा वर्षांपर्यंत जुन्या खासगी BS-6 वाहनांना आता तीन वर्षांसाठी पीयूसी प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे अशा वाहनधारकांना वारंवार प्रदूषण तपासणीसाठी केंद्रावर जाण्याची गरज कमी होईल. असे असले तरी वाहनाचे वय, उत्सर्जन मानक आणि ते खासगी की व्यावसायिक वापरासाठी आहे, यानुसार प्रमाणपत्राची मुदत वेगवेगळी असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे बदल लागू केले आहेत. नेमके नवे नियम काय आहेत, याचा तुमच्यावर काय परिणाम होणार? सविस्तर जाणून घेऊया.  जाणून घ्या.

 तीन वर्षांची मुदत

पहिल्या नोंदणीपासून सहा वर्षांपर्यंत जुन्या असलेल्या खासगी BS-6 कार आणि दुचाकींना आता तीन वर्षांसाठी पीयूसी प्रमाणपत्र मिळेल. सहा वर्षांपेक्षा जुनी; पण दहा वर्षांपर्यंतच्या वाहनांसाठी ही मुदत एक वर्ष असेल. दहा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना दर सहा महिन्यांनी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करावे लागेल. म्हणजे वाहनाचे वय वाढेल, तशी प्रदूषण तपासणीची वारंवारताही वाढणार आहे.

व्यावसायिक वाहनांसाठी वेगळी वॅलिडीटी

व्यावसायिक BS-6 वाहनांसाठी सरकारने स्वतंत्र नियम निश्चित केले आहेत. सहा वर्षांपर्यंतच्या व्यावसायिक वाहनांना दोन वर्षांची पीयूसी वॅलिडीटी मिळेल. सहा ते दहा वर्षे वयोगटातील वाहनांसाठी एक वर्ष, तर दहा वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी सहा महिने वॅलिडीटी असणार आहे. त्यामुळे खासगी वाहनधारकांनी व्यावसायिक वाहनांचे नियम आपल्या वाहनांना लागू आहेत असे समजू नये.

BS-1 ते BS-4 वाहनांसाठी काय नियम?

जुन्या उत्सर्जन मानकांनुसार तयार झालेल्या वाहनांसाठी प्रमाणपत्राची मुदत कमी ठेवण्यात आली आहे.BS-1, BS-2 आणि BS-3 वाहनांसाठी 3 महिने तर BS-4 वाहनांसाठी 6 महिने मुदत आहे.त्यामुळे जुन्या वाहनधारकांना तुलनेने अधिक वेळा प्रदूषण तपासणी करून घ्यावी लागणार आहे.

जुन्या पीयूसी प्रमाणपत्रांचे काय होणार?

नवीन नियम लागू होण्यापूर्वी जारी केलेली पीयूसी प्रमाणपत्रे तात्काळ बदलली जाणार नाहीत. त्यांचे नवीन नियमांनुसार पहिले रिन्यू करताना सुधारित वॅलिडीटी लागू होईल. त्यामुळे सध्या वैध असलेले प्रमाणपत्र केवळ नियम बदलल्यामुळे रद्द होणार नाही. वाहनधारकांनी प्रमाणपत्रावरील अंतिम तारीख तपासणे महत्त्वाचे असेल, याची वाहनचालकांनी नोंद घ्या.

नूतनीकरणासाठी दहा दिवसांचा नियम

पीयूसी प्रमाणपत्राची मुदत संपण्याच्या आधीच्या दहा दिवसांत नूतनीकरण केल्यास नवीन प्रमाणपत्राची वैधता जुन्या प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर सुरू होणार आहे. असे असले तरी मुदत संपल्यानंतर रिन्यू केल्यास नवीन सर्टीफिकेटची वैधता नूतनीकरणाच्या तारखेपासून सुरू होईल. त्यामुळे प्रमाणपत्राची मुदत संपण्यापूर्वीच तपासणी करून घेणे फायदेशीर ठरेल. महाराष्ट्रातील वाहनधारकांनीही अधिकृत पीयूसी केंद्रातून प्रमाणपत्र घेऊन ते वाहनासोबत वैध ठेवणे आवश्यक असणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
New Rules
Marathi News