SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं तब्बल 3,000 रुपयांनी स्वस्त; लक्ष्मीपूजनच्या दिवशी किती असेल सोन्याचा दर?

सोन्याच्या दरात प्रचंड मोठा घसरण झाली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं तब्बल 3,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. चांदीचे दर देखील घसरले आहेत.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 06, 2026, 11:03 PM IST | Updated: Nov 06, 2026, 11:08 PM IST
Join

Gold Rate : दिवाळीला सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी  सोनं तब्बल 3,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मल्टी-कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स गोल्ड फ्युचर्स प्रति 10 ग्रॅम 2,000  ते 1500 रुपयांनी घसरून 1,41,667  ते 1,36000 रुपयांवर आले आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. 

डिसेंबरच्या चांदीच्या वायद्यांमध्ये, चांदीचा दर 3,100 रुपयांनी घसरून 1,84,050 रुपये प्रति किलो झाला आहे. सोन्या-चांदीच्या भावातील ही वाढ ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीतील वाढीच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव 2 टक्क्यांनी वाढून 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1.46 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 4,053.8 डॉलरवर आला. चांदीचा दर 1.70 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 51.485 डॉलर झाला आहे.  
मुंबई आणि  दिल्ली या शहरांमध्ये 24-कॅरेट सोन्याचा भाव 1,46,180 दरम्यान ते 1,3800 आहे. 22 -कॅरेट सोन्याचा दर  1,34,010, तर  18 - कॅरेट सोन्याचा दर 1,09,680 आहे. चांदीचा दर 2,10,100 प्रति किलोग्राम आहे. येथे सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे. 

सोन्या-चांदीच्या किंमती का घसरत आहेत? 

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वनाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे डॉलर निर्देशांक वधारला आहे.  परिणामी, सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तांच्या किंमतीत घट दिसून येत आहे.  विक्रमी उच्चांकावरून सोने आणि चांदी खूप स्वस्त झाले आहेत. 

एमसीएक्स एक्सचेंजवर चांदीचा विक्रमी उच्चांक 4.20 लाख होता. चांदीच्या दरात 1.84 लाख झाला आहे. परिणामी, चांदीच्या दरात प्रति किलो 2.36 लाखांची घसरण झाली आहे. सोन्याचा विक्रमी उच्चांक 1.93 लाख होता, जो आता 52,000 ने घसरून 1.41 लाख झाला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES