• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /गोकुळमध्ये 4 तज्ज्ञ संचालक नियुक्त होणार; गोकुळच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

गोकुळमध्ये 4 तज्ज्ञ संचालक नियुक्त होणार; गोकुळच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

गोकुळमध्ये 4 तज्ज्ञ संचालक नियुक्त होणार आहेत. सहकार विभागाकडून अध्यादेश जारी करण्यात आला आहे. गोकुळच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 06, 2026, 11:25 PM IST|Updated: Nov 06, 2026, 11:30 PM IST
joinshare
गोकुळमध्ये 4 तज्ज्ञ संचालक नियुक्त होणार; गोकुळच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
गोकुळमध्ये 4 तज्ज्ञ संचालक नियुक्त होणार; गोकुळच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

गोकुळमध्ये 4 तज्ज्ञ संचालक नियुक्त होणार; गोकुळच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

2

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं तब्बल 3,000 रुपयांनी स्वस्त; लक्ष्मीपूजनच्या दिवशी किती असेल सोन्याचा दर?

3

हाय कोलेस्टेरॉलची ही लक्षणं दिसताच व्हा सतर्क; दुर्लक्ष पडू शकतं महागात

4

ना शस्त्र, ना थेट हल्ला; हुकूमशहा किम जोंग उनच्या गुप्त सैन्याने जगाला हादरवून सोडले! उत्तर कोरियात दिले जाते भयानक प्रशिक्षण

5

महाराष्ट्र दिल्लीसह 7 राज्यांच्या SIR नोंदणीबाबत निवडणूक आयोगाचा सर्वात मोठा निर्णय; डायरेक्ट नवा GRचं काढला

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

गोकुळ : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 नोव्हेंबरला गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.  या निवडणुकीसाठी 25 निवडून आलेल्या संचालकांना नोटिसा बजावण्याचे निर्देशही देण्यात आलेत. मात्र, या न्यायालयीन लढाईदरम्यान गोकुळच्या सत्तेचं गणित बदलणारा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. पण गोकुळमध्ये शासन नियुक्त 4 सदस्य निवडीवरून महायुतीतच वाद निर्माण झाला आहे. अशातच गोकुळमध्ये 4 तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोकुळच्या अध्यादेशावर राज्यपालांनी सही केली आहे. 

सहकार विभागाकडून अध्यादेश जारी

गोकुळमध्ये शासन नियुक्त 4 सदस्य निवडीवरून महायुतीतच ठिणगी पडली. भाजपनं घेतलेल्या निर्णयावर मित्रपक्ष शिवसेना नाराज आहे.  लोकशाही मार्गाने जे सदस्य निवडून आलेत त्याचा स्वीकार आणि जनतेने जो कौल दिला आहे त्याचा सन्मान केला पाहिजे असं शिवसेनेनं म्हटल. त्यामुळं शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेशी शिवसेना सहमत नसल्याचं समोर आल. यावरुन वाद विवाद सुरु असतानच 4 सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली आहे. 

सरकारने काढलेले परिपत्रक

सन २०२६ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक १६.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्यासाठी अध्यादेश.
ज्याअर्थी, राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही:

1--१९६१ चा आणि ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांकरिता, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० महा. २४. यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे;

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (१९६१ चा महा. २४) याच्या कलम ७३ अअअ मध्ये, सहकारी संस्थेच्या समितीची रचना करण्याची तरतूद आहे. उक्त तरतुदीमध्ये, समितीचे निवडून आलेले सदस्य, समितीने स्वीकृत केलेले तज्ज्ञ संचालक, समितीने नामनिर्देशित केलेले कार्यलक्षी संचालक आणि सहकारी संस्थेच्या कामकाजाशी संबंधित आवश्यक अनुभव व शासन विनिर्दिष्ट करील अशी शैक्षणिक अर्हता असलेले शासनाने नामनिर्देशित केलेले सदस्य यांची समितीमध्ये तरतूद केलेली आहे. तज्ज्ञ संचालक, कार्यलक्षी संचालक व शासनाने नामनिर्देशित केलेले सदस्य यांना, सद्यःस्थितीत समितीच्या बैठकीमध्ये मत देण्याचा हक्क नाही आणि ते, समितीचे पदाधिकारी म्हणून निवडले जाण्यास पात्र नाहीत.

२. मोठी उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांनी, राज्यातील आर्थिक, वित्तीय व सहकार क्षेत्रांत महत्वपूर्ण स्थान प्राप्त केलेले आहे. संघीय सहकारी संस्थांना देखील, भाग भांडवल, कर्ज, हमी, अनुदान, शासकीय जमीन या स्वरूपात किंवा इतर कोणत्याही स्वरूपात शासनाकडून सहाय्य देण्यात येते. मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल असणाऱ्या आणि शासकीय सहाय्य मिळणाऱ्या अशा संस्थांनी, सुरळीतपणे व प्रभावीपणे कार्य करणे गरजेचे आहे. संस्थेच्या कामकाजाशी संबंधित अनुभव व विनिर्दिष्ट अर्हता असलेल्या व्यक्तींना, अशा संस्थांच्या समितीमध्ये सहभागी होणे शक्य व्हावे या दृष्टीने, त्या व्यक्ती, मतदानाच्या हक्कासह, समितीचा सदस्य असणे देखील आवश्यक आहे.

म्हणून, पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या आणि शासनाकडून कोणत्याही स्वरूपात सहाय्य मिळत असलेल्या संघीय संस्थांच्या बाबतीत, कलम २७ च्या पोट-कलम (९) मध्ये आणि अशा संस्थांच्या उपविधींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, अशा संस्थांच्या समितीच्या बैठकीमधील मतदानाच्या हक्कांसह, संस्थेच्या कामकाजाशी संबंधित अनुभव व विनिर्दिष्ट अर्हता असलेल्या चार सदस्यांना आणि मतदानाच्या हक्काशिवाय, एका शासकीय अधिकाऱ्याला देखील, शासनाद्वारे नामनिर्देशित करण्याच्या दृष्टीने, स्वतंत्र तरतूद असणे इष्ट आहे असे शासनास वाटते.

३. राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नाही आणि उपरोक्त प्रयोजनांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० यात आणखी सुधारणा करण्याकरिता, महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे जीमुळे आवश्यक व्हावे अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली आहे, म्हणून हा अध्यादेश प्रख्यापित करण्यात येत आहे.
 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Political News
Kolhapur