Gold Rate : दिवाळीला सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं तब्बल 3,000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. मल्टी-कमोडिटी मार्केटमध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. एमसीएक्स गोल्ड फ्युचर्स प्रति 10 ग्रॅम 2,000 ते 1500 रुपयांनी घसरून 1,41,667 ते 1,36000 रुपयांवर आले आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली.
डिसेंबरच्या चांदीच्या वायद्यांमध्ये, चांदीचा दर 3,100 रुपयांनी घसरून 1,84,050 रुपये प्रति किलो झाला आहे. सोन्या-चांदीच्या भावातील ही वाढ ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीतील वाढीच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव 2 टक्क्यांनी वाढून 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर 1.46 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 4,053.8 डॉलरवर आला. चांदीचा दर 1.70 टक्क्यांनी घसरून प्रति औंस 51.485 डॉलर झाला आहे.
मुंबई आणि दिल्ली या शहरांमध्ये 24-कॅरेट सोन्याचा भाव 1,46,180 दरम्यान ते 1,3800 आहे. 22 -कॅरेट सोन्याचा दर 1,34,010, तर 18 - कॅरेट सोन्याचा दर 1,09,680 आहे. चांदीचा दर 2,10,100 प्रति किलोग्राम आहे. येथे सोने आणि चांदीच्या दरात किंचित वाढ झाली आहे.
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वनाढ झाल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे डॉलर निर्देशांक वधारला आहे. परिणामी, सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित मालमत्तांच्या किंमतीत घट दिसून येत आहे. विक्रमी उच्चांकावरून सोने आणि चांदी खूप स्वस्त झाले आहेत.
एमसीएक्स एक्सचेंजवर चांदीचा विक्रमी उच्चांक 4.20 लाख होता. चांदीच्या दरात 1.84 लाख झाला आहे. परिणामी, चांदीच्या दरात प्रति किलो 2.36 लाखांची घसरण झाली आहे. सोन्याचा विक्रमी उच्चांक 1.93 लाख होता, जो आता 52,000 ने घसरून 1.41 लाख झाला आहे.