SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

विद्यार्थ्यांना मिळणार ₹12000 शिष्यवृत्ती, 31 ऑक्टोबरआधी करा अर्ज;कोणाला मिळणार लाभ?

NMMSS शिष्यवृत्ती 2026-27 साठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. याअंतर्गत वार्षिक ₹12 हजार मदत देण्यात येते. उत्पन्न मर्यादा आणि ऑनलाइन अर्जाची प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 27, 2026, 04:43 PM IST | Updated: Oct 27, 2026, 04:54 PM IST
Image Credit: एनएमएमएसएस शिष्यवृत्ती
Join

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय साधन-सह-गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत (NMMSS) आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही योजना आठवीपुढील शिक्षण सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक आधार देणारी असून पात्रता, अर्जाची प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांबद्दल जाणून घेऊया.

नववी ते बारावीपर्यंत मदतीची संधी

आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मध्येच थांबू नये, हा NMMSS योजनेचा उद्देश आहे. या योजनेत दरवर्षी देशभरातील पात्र विद्यार्थ्यांसाठी नव्या एक लाख शिष्यवृत्त्या दिल्या जातात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नववीपासून शिष्यवृत्ती मिळते. निर्धारित शैक्षणिक अटी पूर्ण केल्यास दहावी, अकरावी आणि बारावीसाठीही नूतनीकरणाद्वारे लाभ सुरू ठेवता येतो. दरवर्षी ₹12000 रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

कोणत्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल?

विद्यार्थी राज्य सरकारच्या, अनुदानित किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत नियमित शिकत असणे आवश्यक आहे. पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹3.50 लाखांपेक्षा जास्त नसावे. शिष्यवृत्तीच्या निवड परीक्षेला बसण्यासाठी सातवीत किमान 55 टक्के गुण किंवा समतुल्य श्रेणी आवश्यक आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना गुणांमध्ये पाच टक्के सवलत आहे. नव्या शिष्यवृत्तीसाठी संबंधित राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने घेतलेल्या निवड परीक्षेत पात्र होणे आवश्यक असते.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

इच्छुक विद्यार्थ्यांनी [राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल](https://scholarships.gov.in/) वर जाऊन अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी वन टाइम रजिस्ट्रेशन (OTR) पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर लॉगिन करून NMMSS योजनेची निवड करावी, आवश्यक माहिती भरावी आणि अर्ज सादर करावा. अर्जातील नाव, शाळेची माहिती, शैक्षणिक तपशील आणि बँक खात्याची माहिती अचूक असल्याची खात्री करा. अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज पूर्ण करणे हिताचे ठरेल.

महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी अर्जाची मुदत 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवली आहे. अर्ज सादर केल्यानंतर शाळा किंवा संस्थेच्या नोडल अधिकाऱ्यांकडून पहिल्या टप्प्यातील पडताळणी 15 नोव्हेंबरपर्यंत, तर जिल्हा नोडल अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या टप्प्यातील पडताळणी 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

अर्ज केल्यानंतर काय काळजी घ्यावी?

अर्ज सादर केल्यानंतर त्याची स्थिती पोर्टलवर तपासावी आणि शाळेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जात त्रुटी असल्यास त्या वेळेत दुरुस्त करण्यासाठी अधिकृत सूचनांचे पालन करा. तसेच शिष्यवृत्तीची निवड आणि रक्कम मिळणे हे पात्रता, निवड परीक्षा, पडताळणी आणि योजनेच्या नियमांवर अवलंबून आहे. त्यामुळे अर्ज केला म्हणजे शिष्यवृत्ती निश्चित मिळेल, असे समजू नका, असा सल्लाही विद्यार्थ्यांना देण्यात आलाय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES