SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

आजपासून बदललाय मोबाईल कॉलिंगसंदर्भातील नियम, तुमच्यावर काय परिणाम? जाणून घ्या

1 नोव्हेंबर 2026 पासून भारतात CNAP सेवा लागू झाली आहे. आता अनोळखी नंबरवरून फोन आल्यास कॉल करणाऱ्याचे नावही दिसणार आहे. 4G, 5G नेटवर्क, ट्रूकॉलर शिवाय कॉलरचे नाव कसे कळणार आणि नव्या नियमातील अपवाद काय? जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 01, 2026, 02:21 PM IST | Updated: Nov 01, 2026, 02:30 PM IST
Image Credit: कॉलिंग नियमात बदल
Join

मोबाईलवर अनोळखी नंबरवरून फोन आला की तो कोणाचा असेल, याचा अंदाज बांधावा लागतो. अनेक जण यासाठी ट्रूकॉलरसारख्या अ‍ॅपचा वापर करतात. मात्र, आता अशा अ‍ॅपशिवायही कॉल करणाऱ्याचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) 1 नोव्हेंबर 2026 पासून कॉलिंग नेम प्रेसेंटेशन म्हणजेच CNAP सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. या सुविधेमुळे कॉल करणाऱ्याचा नंबर आणि त्याच्या टेलिकॉम कंपनीकडे नोंद असलेले नाव दिसेल. विशेष म्हणजे, ग्राहकांना यासाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज नसेल. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

CNAP सेवा म्हणजे नेमकं काय?

CNAP म्हणजे कॉलिंग नेम प्रेसेंटेशन सध्या फोन आल्यावर स्क्रीनवर मुख्यतः नंबर दिसतो. नव्या सुविधेत त्या नंबरसोबत कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नावही दिसेल. हे नाव संबंधित टेलिकॉम ऑपरेटरच्या ग्राहक नोंदणी आणि KYC डेटाबेसमधून घेतले जाणार आहे.

ट्रूकॉलर डाउनलोड करण्याची गरज नाही

या सेवेसाठी वेगळे अ‍ॅप डाउनलोड करण्याची किंवा पैसे भरण्याची आवश्यकता नाही. टेलिकॉम कंपन्यांना ही सुविधा ग्राहकांसाठी आपोआप उपलब्ध करून देण्याचे निर्देश आहेत. म्हणजेच एअरटेल, जियो, वोडाफोन, आयडीया यांसारख्या कंपन्यांच्या पात्र नेटवर्कवरील ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे.

कोणत्या मोबाईलवर दिसणार नाव?

सुरुवातीला ही सुविधा 4G आणि त्यापुढील तंत्रज्ञानावर आधारित मोबाईल नेटवर्कसाठी लागू आहे. 2G, 3G आणि लँडलाइन सेवांसाठी CNAP लागू करण्याचा निर्णय नंतर स्वतंत्रपणे घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मोबाईलवर आजपासूनच नाव दिसेल, असे समजू नये, असा सल्ला यूजर्सना देण्यात आलाय.

नंबर सेव्ह असेल तर काय दिसणार?

एखाद्याचा नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह असेल, तर तुम्ही सेव्ह केलेले नावच दिसेल. नंबर सेव्ह नसेल, तर टेलिकॉम कंपनीच्या नोंदीतील नाव स्क्रीनवर येईल. परदेशातून कॉल आल्यास आंतरराष्ट्रीय कॉल असा उल्लेख दिसेल. कॉलरने नंबर लपवण्याची CLIR सुविधा घेतली असल्यास त्याचे नाव दाखवले जाणार नाही.

काय सावधगिरी आवश्यक?

CNAP मुळे अनोळखी कॉल ओळखणे सोपे होऊ शकते. मात्र स्क्रीनवर दिसणारे नाव म्हणजे कॉल करणारी व्यक्ती विश्वासार्ह आहे, याची हमी नाही. अनेकदा केवायसी नोंदीतील नाव जुने किंवा चुकीचे असण्याची शक्यता असते. त्यामुळे बँक, सरकारी अधिकारी किंवा कुरिअर कर्मचारी असल्याचे सांगून ओटीपी, पिन किंवा बँक तपशील मागणाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आलाय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES