पुन्हा 26/11 सारख्या हल्ल्याचा कट, धमकीच्या पत्राने शहर हादरलं! 300 लोकांना मारण्याची धमकी
मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याला 18 वर्षे पूर्ण होणार. अशातच पुन्हा एकदा 26/11 सारखा हल्ला करण्यात येईल असा धमकी देणार ईमेलमुळे देशात खळबळ माजली आहे.
मुंबईतील 26/11 सारखा हल्ल्याची धमकी तेलंगणाच्या हैदराबाद शहराला आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. हैदराबादमधील पोलिसांपासून सुरक्षा यंत्रणा हाय अर्लट मोडवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा मेसेज पाकिस्थानस्थित दहशतवादी संघटना लश्कर - ए - तोयबा कडून आल्याचं समजतंय.
या मेसेजमध्ये शहरातील दोन ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी या इमेलमधून देण्यात आली आहे. जम्मू - काश्मीरमधील लष्कराच सदस्य लतीफ भट याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात येणार आहे. याच महिन्याच्या 18 नोव्हेंबरला कुलगाममधील जंगलपोरा इथे झाल्लाय सुरक्षा दलांसोबतच्या चकमकीत लतीफ भट ठार झाला होता.
या ईमेलमध्ये त्यांनी बॉम्बस्फोट कुठल्या ठिकाणी घडलणार आहे, याचा ठिकाणाचाही उल्लेख केला आहे. काचीगुडा येथील 'हॉटेल टुरिस्ट प्लाझा' आणि 'काचीगुडा रेल्वे स्टेशन' या ठिकाणी दहशतवाद्याचे टार्गेट असल्याचे सांगण्यात येत आहे. हैदराबाद शहर पोलीस दलाच्या सहपोलीस आयुक्तांनी (विशेष शाखा) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हे धमकीचे ईमेल आलं आहे. या ईमेलमध्ये दोन ठिकाणांसह 300 लोकांना टार्गेट करण्यात येईल असं उल्लेख आहे.
या धमकीनंतर शहरातील इतर हॉटेल्स, रेल्वे आणि बस स्थानके, धार्मिक स्थळे आणि इतर संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. मुंबईनंतर दहशतवाद्यांचा हिटलिस्टवर हैदराबाद हे शहर कायम आहे. दुसरीकडे धमकीच्या ईमेलचा स्रोत आणि तो खरा आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी अधिकाऱ्याकडून तपास सुरू आहे. जोपर्यंत या ईमेलमागील सत्य समोर येत नाही, शहरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.