ठाणे जिल्हातील मुंब्रा परिसरामधून मोठी बातमी समोर आली आहे, मुंब्रा परिसरामध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू असल्याची माहिती समोर आली आहे. रेतीबंदर रोडवर मुंब्रा येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे, या धडकेनंतर दुचाकीवरील दोन्ही तरुण कंटेनरच्या खाली अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलिस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले.
घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर दोघांनाही बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अरिस अस्लम कुरेशी आणि इरफान अहमद अन्सारी अशी मृत तरुणांची नावे असून, दोघेही १८ वर्षांचे होते. दरम्यान, अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, मुंब्रा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.