SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

देशातून नैऋत्य मान्सूनची माघार, पण आता दुसरा मान्सून सुरू, कोणत्या जिल्ह्यांत कोसळणार

देशातून नैऋत्य मान्सूनने माघार घेतली आहे. त्यानंतर आता देशात दुसरा मान्सून सुरू झाला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 21, 2026, 01:11 PM IST | Updated: Oct 21, 2026, 01:13 PM IST
Image Credit: Northeast monsoon arrives
Join

महाराष्ट्रातून मान्सूनने माघार घेतली आहे. देशातून 15 ऑक्टोबर रोजी नैऋत्य मान्सूनने माघार घेतली आहे. तर भारतात दुसरा मान्सून सुरू झाला आहे. हा दुसरा मान्सून म्हणजे काय? जाणून घेऊयात.

मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर यंदा मान्सून तब्बल 4 महिने 11 दिवस देशात मुक्काम केला. 4 जून रोजी केरळसह कर्नाटकच्या काही भागात मान्सून दाखल झाला होता. त्यानंतर 6 जून रोजी तळकोकणात मान्सूनने दस्तक दिली. त्यानंतर मात्र मान्सून मात्र रडतखडतच प्रवास केला. 29 जून रोजी मान्सूनने संपूर्ण राज्य व्यापले होते.

यंदा 19 सप्टेंबर रोजी मान्सूनने पश्चिम राजस्थानातून परतीचा प्रवास सुरु केला. 8 ऑक्टोबर रोजी मान्सून संपूर्ण राज्यातून माघारी फिरला तर 15 ऑक्टोबरला 2026 रोजी संपूर्ण भारतातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली. याचसोब दक्षिण भारतात ईशान्य मान्सूनची सुरूवात झाली.

ईशान्य मान्सून म्हणजे काय?

15 ऑक्टोबरपासून दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ईशान्य मॉन्सून सक्रिय झाला आहे.

भारतात ईशान्य मान्सून हा प्रामुख्याने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत सक्रिय होतो. नैर्ऋत्य मान्सूनच्या माघारीनंतर, जमिनीकडून समुद्राकडे (ईशान्येकडून) वाहणारे वारे बंगालच्या उपसागरातून बाष्प घेऊन दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पाडतात. त्यामुळं या मान्सूनला ईशान्य मान्सून असं म्हणतात.

ईशान्य मान्सूनला साधारणपणे हिवाळी मान्सून म्हणूनही ओळखला जातो. या मान्सूनचा प्रभाव तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, यानम, रायलसीमा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश, केरळ, माहे आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक या प्रदेशांवर पडतो. या हंगामात तामिळनाडूमध्ये वार्षिक पावसापैकी जवळपास निम्मा पाऊस पडतो.

ईशान्य मान्सूनचा रब्बी पिकांना अधिक फायदा होतो. दक्षिण भारतातील शेती आणि रबी पिकांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

राज्यातील वातावरणात बदल?

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील संभाव्य हवामान प्रणालींमुळे राज्यातील वातावरणात बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होण्यासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात सध्या उकाडा जाणवत असून, हवामानातील बदलामुळे मुंबईतही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES