पंजाब विधानसभा निवडणुक : पंजाब विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच राजकीय वातावरण तापले आहे. आम आदमी पार्टीने 31 ऑक्टोबर 2026 रोजी 2027 मध्ये होणाऱ्या आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, ही यादी जाहीर होण्याआधी पंजाबमध्ये खळबळजनक राजकीय घडमोड घडली आहे. आम आदमी पार्टीच्या 3 आमदारांनी पक्ष सोडला आहे. यादी जाहीर झाली नसती तर 15-20 आमदार अमित शाहांसोबत गेले असते असा दावा पक्ष सोडणाऱ्या आमदाराने केला आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का बसला आहे. 'आप'च्या दोन आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पटयाला येथील समानाचे आमदार चेतन सिंग जोडमाजरा आणि सनौरचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा अशी या आमदारांची उमेदवारांचा यादी जाहीर होताच पक्षाचा राजीनामा दिला. यांच्यासह निलंबित आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंह यांनी पंजाब विधानसभेचा राजीनामा दिला आहे. यावरुन भाजपने 'आप'ला लक्ष्य केले आहे.
सानौर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. समाना येथील माजी मंत्री आणि आमदार चेतन सिंग जोडमाजरा यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.
चेतन सिंग जोडमाजरा आणि हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी पक्षातूचा राजीनामा दिल्यानंतर, भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील एक पोस्ट शेअर करत त्यांनी भाजपला डिवचले आहे. रविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या 94 मुक्या मेंढ्यांपैकी एक सद्सद्विवेकबुद्धी असलेला माणूस वेगळा झाला आहे. खरा चित्रपट तर आता कुठे सुरू झाला आहे अशी पोस्ट त्यांनी केली.
आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर चेतन सिंग जोरामाजरा आणि हरमीत सिंग पठाणमाजरा हे दोन्ही नेते भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी जोरदार चर्चा होती. पक्षाचा राजीनामा दिलेल्या या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
आम आदमी पार्टीच्या 40 उमेदवारांच्या पहिल्या यादीत पुन्हा निवडून आलेल्या उमदेवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, जर, आम आदमी पार्टीने लवकर यादी जाहीर केली नासती तर 15-20 आमदार अमित शाहांसोबत गेले असते. 15-20 आमदार अमित शाहांच्या संपर्कात होते असा दावा आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी केला आहे.