Saving Method : जेव्हाही महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार हातात येतो तेव्हा अनेकांना हाच प्रश्न पडतो की या महिन्यात मी नेमके किती पैसे वाचवू? काही मित्र विचार करतात की पगाराचा अर्धा भाग हा बँकेत टाकावा, तर काहीजण म्हणतात की आयुष्य जगण्यासाठी थोडे फार पैसे वाचवून बाकी उर्वरित पैशांनी मजा करून घ्यावी. पण खरंतर असंय की प्रत्येक व्यक्तीचं जीवन जगण्याची पद्धत आणि गरजा या वेगवेगळ्या आहेत.
आर्थिक तज्ज्ञ आणि स्मार्ट एआय प्लेटफॉर्म Kwala Intel ने लोकांना त्यांचे पैसे वाचवण्याच्या उद्देशाने 3 वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये विभागलं आहे. तेव्हा सध्या भाषेत समजून घेऊयात की सोप्या भाषेत समजून घेऊया की, तुम्ही कोणत्या प्रकारचे 'बचतकर्ते'आहात आणि दरमहा तुम्ही किती पैसे वाचवले पाहिजेत.
पैसे वाचवणारे लोकं तीन प्रकारची असतात - तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता?
एग्रेसिव सेवर्स (Aggressive Savers)- भविष्याला सर्वात वर ठेवणारे :
कशी असते स्टाईल? हे अशा प्रकारचे लोक आहेत जे वर्तमानातील सुखात मग्न राहण्यापेक्षा आपल्या भविष्याला सुरक्षित करण्याला अधिक प्राधान्य देतात. भविष्यात कोणतीही आर्थिक चिंता नसावी आणि लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, यासाठी ते आज काही तडजोडी करायलाही तयार असतात.
किती पैसे वाचवावेत : अशी लोकं त्यांच्या कमाईतील 30% ते 50% टक्के भाग वाचवतात. तसेच वाचवलेले पैसे ते अशा ठिकाणी लावतात जिथे त्यांना खूप नफा होईल.
मॉडरेट सेवर्स (Moderate Savers) - जे लोक समतोल राखतात :
कशी असते स्टाईल? अशी लोकं ना कंजूस असतात ना बेहिशेबी खर्च करतात. हे आपल्या दररोजच्या आयुष्यात सुद्धा अतिशय मजेत जगतात आणि सोबतच मोठी स्वप्न जसं घर खरेदी करणं, लहान मुलांचं शिक्षण, गाडी घेणं इत्यादींसाठी पैसे देखील जोडतात.
किती पैसे वाचवावेत : अशी लोकं त्यांच्या कमाईतील 20% ते 30% रक्कम बाजूला ठेवतात.
लाइफस्टाइल-फोकस्ड सेवर्स (Lifestyle-focused Savers) - आयुष्य खुलेपणाने जगणारे लोक :
कशी असते स्टाईल? अशा लोकांचा जीवन जगण्याचा फंडा अतिशय साधा असतो. 'आयुष्य एकदाच मिळते!' ते वर्तमानातील क्षणांना आणि सकारात्मक अनुभवांना अधिक महत्त्व देतात. त्यांना आपल्या दैनंदिन जीवनशैलीत कोणतेही मोठे बदल किंवा कपात करायची नसते. त्याऐवजी ते एक छोटी आणि सहज पाळता येईल अशी सवय स्वीकारून थोडी बचत करतात.
किती पैसे वाचवावेत : अशी लोक त्यांच्या कमाईपैकी 10% ते 15% रक्कम बचत करतात, ज्यामुळे भविष्यातील मूलभूत गरजा पूर्ण होण्याची खात्री मिळते आणि त्याच वेळी ते वर्तमानातील जीवनाचा आनंदही घेऊ शकतात.
Kwala Intel सोबत स्मार्ट बचत :
आता Kwala Intel Try करा : https://kwalaintel.com/in/
अनलिमिटेड AI स्टॉक आणि रिटायरमेंट रिसर्च : फक्त दरमहा 1000 रुपयात.
तुमची प्रोफाइल काय आहे? स्वतः असं करा निरीक्षण
Kwala Intel चा स्मार्ट एआई प्लेटफॉर्म सांगतो की तुम्ही स्वतःला फक्त हे तीन प्रश्न विचारा. त्यावरून तुम्हाला समजेल की तुम्ही नेमके कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडता.
तुमचे स्वप्न खूप लवकर निवृत्त होऊन जीवनाचा आनंद घेण्याचे आहे का? (तर मग तुम्ही 'आक्रमक' (Aggressive) श्रेणीत येता.)
तुमचे ध्येय पुढील 3-5 वर्षांच्या आत घर किंवा कारसारखी एखादी मोठी वस्तू खरेदी करण्याचे आहे का? (तर मग तुम्ही 'मध्यम' (Moderate) श्रेणीत येता.)
तुम्हाला सध्याच्या आरामात किंवा खर्चात कोणतीही तडजोड न करता, थोडी सुरक्षित भूमिका घ्यायची आहे का? (असे असेल, तर तुमचा भर जीवनशैलीवर आहे.)
पैशांना योग्य ठिकाणी कसं लावावं?
Kwala Intel चं सांगणं आहे की आधी तुमचे सर्व कर्ज फेडून टाका आणि मग एक इमर्जन्सी फंड तयार करा. यानंतर तुमच्या श्रेणींनुसार पैशांचे वाटप खालीलप्रमाणे करा.
अग्रेसिव्ह गुंतवणूकदार : 80% पैसे हे शेअर्स किंवा म्यूचुअल फंड (Equity) मध्ये लावा आणि 20% टक्के सुरक्षित ठिकाणी.
मॉडरेट गुंतवणूकदार : 60% इक्विटी मध्ये आणि 40% सुरक्षित जागेवर.
लाइफस्टाइल-फोकस्ड सेवर्स : 30% इक्विटीमध्ये आणि 70% सुरक्षित बँकेत ठेवावेत.
थोडक्यात सांगायचे तर : जर तुम्हाला काही वर्षांच्या आत पैशांची गरज पडणार असेल तर ते सर्व पैसे शेअर बाजारात गुंतवू नका. त्याऐवजी ते सुरक्षित ठिकाणी ठेवा!
महागाईपासून कसे वाचाल :
आज ज्या गोष्टीची किंमत 100 रुपये आहे, ती उद्या अधिक महाग होईल. यालाच आपण 'महागाई' म्हणतो. जर तुम्ही तुमचे सर्व पैसे फक्त बँकेच्या बचत खात्यात ठेवले, तर महागाईमुळे तुमच्या पैशांचे मूल्य हळूहळू कमी होत जाईल.
म्हणूनच Kwala Intel सारखे स्मार्ट तंत्रज्ञान असे सुचवते की, दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही मोजमाप करून जोखीम घेणे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमच्या पैशांची वाढ महागाईच्या दरासोबतच होत राहील याची खात्री करता येईल.
पैसे वाचवणे आणि त्यांना योग्य ठिकाणी गुंतवणं याचा एक फॉर्म्युला सर्वांना फिट बसत नाही. तुम्ही तुमची कमाई, खर्च करण्याची पद्धत आणि स्वप्नांना पाहा.
आजच तुमच्या बचतीची योग्य प्लॅनिंग सुरु करा.