SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तिघांनी पक्ष सोडला, 15-20 आमदार अमित शाहांच्या संपर्कात? आणखी एका राज्यात मोठा राजकीय भूकंप

3 आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 15-20 आमदार अमित शाहांसोबत गेले असते असा दावा आम आदमी पक्ष सोडणाऱ्या आमदाराने केला आहे. यामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आपने 40 उमेदवांराची यादी जाहीर केली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 02, 2026, 07:23 PM IST | Updated: Nov 02, 2026, 07:24 PM IST
Join

पंजाब विधानसभा निवडणुक : पंजाब विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याआधीच राजकीय वातावरण तापले आहे. आम आदमी पार्टीने 31 ऑक्टोबर 2026 रोजी 2027 मध्ये होणाऱ्या आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, ही यादी जाहीर होण्याआधी पंजाबमध्ये   खळबळजनक राजकीय घडमोड घडली आहे. आम आदमी पार्टीच्या 3 आमदारांनी पक्ष सोडला आहे. यादी जाहीर झाली नसती तर 15-20 आमदार अमित शाहांसोबत गेले असते असा दावा पक्ष सोडणाऱ्या आमदाराने केला आहे. 

विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का बसला आहे. 'आप'च्या दोन आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. पटयाला  येथील समानाचे आमदार चेतन सिंग जोडमाजरा आणि सनौरचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा अशी या आमदारांची उमेदवारांचा यादी जाहीर होताच पक्षाचा राजीनामा दिला. यांच्यासह निलंबित आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी कुंवर विजय प्रताप सिंह यांनी पंजाब विधानसभेचा राजीनामा दिला आहे.  यावरुन भाजपने 'आप'ला लक्ष्य केले आहे. 

सानौर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. समाना येथील माजी मंत्री आणि आमदार चेतन सिंग जोडमाजरा यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.

भाजपचा हल्लाबोल

चेतन सिंग जोडमाजरा आणि हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी पक्षातूचा राजीनामा दिल्यानंतर, भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आम आदमी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावरील एक पोस्ट शेअर करत त्यांनी भाजपला डिवचले आहे. रविंद केजरीवाल आणि भगवंत मान यांच्या 94 मुक्या मेंढ्यांपैकी एक सद्सद्विवेकबुद्धी असलेला माणूस वेगळा झाला आहे. खरा चित्रपट तर आता कुठे सुरू झाला आहे अशी पोस्ट त्यांनी केली. 

भाजपमध्ये सामील होणार

आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर चेतन सिंग जोरामाजरा आणि हरमीत सिंग पठाणमाजरा हे दोन्ही नेते भाजपमध्ये सामील होऊ शकतात अशी जोरदार चर्चा होती. पक्षाचा राजीनामा दिलेल्या या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

15-20 आमदार अमित शाहांसोबत गेले असते

आम आदमी पार्टीच्या 40 उमेदवारांच्या पहिल्या यादीत पुन्हा निवडून आलेल्या उमदेवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, जर, आम आदमी पार्टीने लवकर यादी जाहीर केली नासती तर 15-20 आमदार अमित शाहांसोबत गेले असते. 15-20 आमदार अमित शाहांच्या संपर्कात होते असा दावा आमदार हरमीत सिंग पठाणमाजरा यांनी केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES