SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली; नोकरीचा त्याग करून बनली जैन संन्यासी

न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाल. मात्र, न्यायाधीच्या खुर्चीवर विराजमान होण्याआधी प्रखराश्री दीदी जैन सन्यासी बनण्याचा निर्णय घेतला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 03, 2026, 11:59 PM IST | Updated: Nov 04, 2026, 12:01 AM IST
Join

Civil Judge Became Jain Monk: न्यायाधीश पदाची कठोर परीक्षा उत्तीर्ण झाली. आई बाबांचे स्वप्न पूर्ण केले मात्र, न्यायाधीश पदाच्या नोकरीचा त्याग करून करुन वैराग्याचा मार्ग स्विकारला.  मध्य प्रदेशातील बेतुलच्या रहिवासी असलेल्या प्रखराश्री दीदी जैन सन्यासी बनण्याचा निर्णय घेतला आहे. 

एलएलबी पूर्ण केल्यानंतर, 2023 मध्ये त्यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली. त्याच्या आयुष्यातील यशाचा सर्वात मोठा क्षम होता.  न्यायालयात पदभार स्वीकारण्यापूर्वी, त्यांनी जैन दीक्षा घेऊन आध्यात्मिक मार्गाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.  त्यांच्या संन्यासापूर्वी  भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. 

प्रखराश्री यांचे सुरुवातीचे शिक्षण मध्य प्रदेशातील बेतुल येथे झाले. भोपाळमध्ये त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्या न्यायाधीश व्हाव्यात अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती. 

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये घेतले शिक्षण 

प्रखरश्री जैन उच्चशिक्षित आहेत. त्यांनी भोपाळमधील एका प्रतिष्ठित शाळेत शिक्षण घेतले. बारावी पूर्ण केल्यानंतर, प्रखराश्रीने कॉमन लॉ ॲडमिशन टेस्ट (CLAT) उत्तीर्ण केली.त्यानंतर अहमदाबादमधून एलएलबी पूर्ण केले.  त्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये उच्च शिक्षण घेतले. 2023 मध्ये प्रखरश्री जैन यांची दिवाणी न्यायाधीश पदासाठी निवड झाली होती, परंतु त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

2023 मध्ये, त्यांची दिवाणी न्यायाधीश पदासाठी निवड झाली. त्यांनी आपल्या आई-वडिलांचे न्यायाधीश बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. मात्र, पदावर रुजू होण्यापूर्वी त्यांनी न्यायिक सेवेत जाण्याऐवजी जैन दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.  त्यांना लहानपणापासूनच आध्यात्मिक जीवनात रस आहे. न्यायाधीश किंवा वकील म्हणून काम करण्यापेक्षा भगवान महावीरांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करणे समाजासाठी अधिक फायदेशीर ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे. 

प्रखरश्री यांनी जैन दीक्षेची शपथ घेऊन तिने मोक्षाचा मार्ग निवडला आहे. त्यांचे वडील एलआयसीचे निवृत्त अधिकारी आहेत.  प्रखरश्री यांच्यासोबत इतर चार भगिनींनीही ऐहिक इच्छांचा त्याग करून भक्तीचा मार्ग स्वीकारला आहे. रविवारी बेतुलमध्ये या पाच भगिनींसाठी बिनाउली यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES