SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

...तर ₹5000 दंड आणि 6 महिने जेलची शिक्षा! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात मोबाईल वापरणाऱ्यांना रेल्वेचा दणका

तुम्हालाही अनेकदा ट्रेनने प्रवास करताना शेजारच्या व्यक्तीने मोठ्याने मोबाईलवर लावलेली गाणी किंवा सोशल मीडियावरील रिल्सच्या आवाजाने त्रास झाला असेल. पण आता अशा प्रवाशांना रेल्वेने दंड करण्याचं ठरवलं आहे. नेमका हा नियम काय जाणून घेऊयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 20, 2026, 06:57 AM IST | Updated: Oct 20, 2026, 07:52 AM IST
Image Credit: रेल्वेने जारी केला इशारा (प्रातिनिधिक फोटो)
Join

मुंबईची लोकल ट्रेन असो किंवा लांब पल्ल्याच्या गाड्या असो डब्यात असा एक कोणी ना कोणी असतो जो मोठ्या आवाजात आपल्या मोबाईल गाणी ऐकत असतो किंवा इन्स्टाग्रामवरील रील्स पाहत असतो. अनेकदा अशा लोकांना सार्वजनिक ठिकाणी कसं वागावं याचं साध भानंही नाही का असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. बरं अशा व्यक्तींना आवाज कमी करण्यास सांगितल्यास त्यावरुनही वाद होतो. त्यामुळे अनेकजण त्रास होत असूनही आवाज कमी करा असं सांगण्याच्या फंद्यात पडत नाहीत. मात्र अशा व्यक्तींविरुद्ध रेल्वेनेच कारवाई केली पाहिजे असं अनेकदा वाटतं. अनेकांच्या मनातील ही सुप्त इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण रेल्वेनेच आता या मोबाईलवरील भोंग्यांवर लगाम आणण्याचा निर्णय घेतला असून थेट आर्थिक दंड आकारण्याची तयारी केली आहे. 

6 वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजार दंड

खरं तर रेल्वे प्रवासादरम्यान इतर प्रवासी मोबाईल फोनवर मोठ्या आवाजात बोलत असतील किंवा स्पीकर मोडवर वापरत असतील, तर त्याचा त्रास नक्कीच होतो. पण आता दक्षिण रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना या त्रासातून मुक्ती मिळणार आहे. दक्षिण रेल्वेने यासंदर्भात नुकतेच एक परिपत्रक जारी केलं आहे. प्रवासादरम्यान जर कोणी  मोबाईल फोन स्पीकर मोडवर वापरताना किंवा मोठ्या आवाजात बोलताना आढळले, तर त्यांना 1 हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. विशेष म्हणजे त्यानंतरही असे वर्तन सुरु राहिले तर संबंधित व्यक्तीला मोठा दंड होऊ शकतो. अनेकदा या नियमाचं उल्लंघन करणाऱ्याला कमाल शिक्षेची तरतूद ही सहा महिने तुरुंगवास आणि 5 हजार रुपयांपर्यंत दंडाची आहे.

एका घटनेनंतर घेतला रेल्वेने निर्णय

रेल्वेतील तिकीट तपासनीस आता अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंड आकारू शकतील, असं रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. खरं तर दक्षिण रेल्वेला हा शहाणपणा एका विचित्र प्रसंगानंतर सुचला आहे. कर्नाटकमधील गायिका शिवश्री स्कंदप्रसाद यांना अशाच एका व्यक्तीचा त्रास होत असल्याने चक्क रेल्वे सुरक्षा दलाची मदत घ्यावी लागली. सोबत प्रवास करणारा एक सहप्रवासी काहीही केलं तरी आपल्या मोबाईलचा आवाज कमी करण्यास तयार नव्हता. अखेर त्यांनी रेल्वे सुरक्षा दलाची मदत घेण्याशिवाय इतर पर्याय उरला नाही. या नियमाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वे कर्मचारी सार्वजनिक घोषणा करतील आणि तिकीट तपासनीस आता दोषी प्रवाशांना जागेवरच दंड आकारू शकतील.

या मागचा हेतू काय?

रेल्वे प्रवासातदरम्यान वेगवेगळ्या कारणांसाठी मोबाईल इंटरनेटचा वापर वाढत असताना, सर्वांचा प्रवास अधिक शांत आणि सुखद व्हावा, हाच यामागचा मुख्य उद्देश असल्याचं दक्षिण रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES