SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

RBI ने 60 टन सोनं भारतात परत आणले; सुवर्णसाठा 84 टक्क्यांवर पोहचला; सोनच्या दरावर होणार मोठा परिणाम

आरबीआयने परदेशातून सुमारे 60 टन सोनं भारतात परत आणले आहे. भारताचा सुवर्णसाठा 84 टक्क्यांवर पोहचला आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 26, 2026, 19:31 IST | Updated: Nov 26, 2026, 19:32 IST
Join

RBI On Gold : ऑक्टोबर 2026 पासून भारतात सोनं चांदीच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे सर्व सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) एक उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मागील सहा महिन्यांत, आरबीआयने परदेशातून सुमारे 60 टन सोनं भारतात परत आणले आहे.  आरबीआयच्या सुवर्णसाठा 84 टक्क्यांवर पोहचला आहे. यापूर्वी हा वाटा 77 टक्के पेक्षा किंचित जास्त होता.

भारत आता आपल्या सुवर्णसाठ्याचा एक मोठा भाग देशांतर्गत साठवत आहे. जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या काळात आरबीआयने घेतलेला हा निर्णय देशाला आर्थिक स्थिरता मिळवूण देण्यास निर्णायक भूमिका बजावणारा आहे.  

सोनं साठ्यात वाढ 

आरबीआयने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार मार्च ते सप्टेंबर 2026 दरम्यान 60.08 टन सोने भारतात परत आणले आहे. परिणामी, आरबीआयकडे आता एकूण 880.52 टन सोने आहे. यापैकी, सप्टेंबर 2026 च्या अखेरीस 740.13 टन सोने भारतात राहिले. उर्वरित सोने परदेशात साठवले आहे. तथापि, यामुळे भारताच्या एकूण सोन्याच्या साठ्यात वाढ झालेली नाही. केवळ परदेशात असलेले सोनेच भारतात परत आणले गेले आहे.

परदेशात साठवलेले सोनं भारतात परत आणले? 

आरबीआयने परदेशात साठवलेले सोनं भारतात परत आणले आहे.  जगभरातील अनेक देशांमध्ये तणाव, युद्धे आणि आर्थिक अनिश्चिततेचा सावट आहे. जागतिक परिस्थिताचा आढावा घेत RBI ने सुवर्णसाठा देशातच सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जगात आर्थिक अस्थिरता अथवा तणाव स्थिती निर्माण झाल्यास  परदेशात साठवलेले सोने धोक्यात येऊ शकते. त्यामुळे, भारताला आपल्या सोन्याचा मोठा हिस्सा देशांतर्गत ठेवायचा आहे, जेणेकरून गरज पडल्यास त्यावर सहज नियंत्रण ठेवता येईल.

भारतात सोन्याचा दर 50,000 रुपयांनी घसरला

भारतात सोन्याच्या किंमती झपाट्याने घसरत आहेत. जानेवारीमध्ये सोन्याने प्रति 10 ग्रॅम सुमारे 1.80 लाख रुपयांचा उच्चांकी दर गाठला होता.  सोन्याचे दर प्रचंड प्रमाणात घसरले आहेत. सोन्याचा दर 1.20 लाख रुपयांवर आला आहे.  दर पाहता सोन्याच्या दरात 27 टक्क्यांची घसरण झाली आहे. 2027 पर्यंत सोन्याचे दर पुन्हा वाढू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, सोन्याच्या प्रमाणात वाढ होऊनही, परकीय चलन साठ्याच्या एकूण मूल्यात त्याचा वाटा कमी झाला आहे. अमेरिकन डॉलरच्या मूल्याच्या संदर्भात, परकीय चलन साठ्यामधील सोन्याचा वाटा मार्च 2026 अखेरीस असलेल्या 16.70 टक्केच्या तुलनेत सप्टेंबर 2026 अखेरीस 14.38 टक्के पर्यंत घसरला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES