SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

₹10 आणि ₹20 च्या नोटासंदर्भात RBI चा मोठा प्लॅन; तुमच्यावर काय परिणाम? आताच घ्या जाणून!

RBI ₹10 आणि ₹20 च्या पॉलिमर नोटांची चाचणी करण्याच्या तयारीत. कागदी नोटांपेक्षा दोन ते चार पट टिकाऊ नोटा, एटीएमच्या आकारमानात बदल टाळण्याची योजना आणि एप्रिल 2027 ची संभाव्य तारीख जाणून घ्या.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 30, 2026, 10:02 PM IST | Updated: Oct 30, 2026, 10:08 PM IST
Image Credit: 10,20 रुपयांच्या नोटा
Join

तुमच्या खिशातील दहा आणि वीस रुपयांच्या नोटांचे स्वरूप आगामी काळात बदलू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कमी मूल्याच्या नोटांसाठी पॉलिमर म्हणजेच प्लास्टिकसदृश विशेष पदार्थापासून तयार केलेल्या नोटांची चाचणी करण्याच्या तयारीत आहे. या नोटा सध्याच्या कागदी नोटांपेक्षा अधिक टिकाऊ असण्याची अपेक्षा आहे. काय असेल यात खास? सविस्तर जाणून घेऊया.

दोन अब्ज नोटांची चाचणी

केंद्र सरकारने RBI च्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार प्रत्येकी १०० कोटी म्हणजेच एक अब्ज ₹10 आणि ₹20 च्या पॉलिमर नोटांची क्षेत्रीय चाचणी करण्याचे नियोजन आहे. या नोटांचे एकत्रित दर्शनी मूल्य सुमारे 3000 कोटी रुपये असेल. चाचणी यशस्वी झाल्यानंतरच नियमित वितरणाचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सध्या लगेच या नोटा बाजारात येणार नाहीत याची ग्राहकांनी नोंद घ्या..

कागदी नोटांपेक्षा टिकाऊ?

पॉलिमर नोटांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांची टिकाऊ क्षमता. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोटा पारंपरिक कागदी नोटांपेक्षा दोन ते चार पट अधिक काळ टिकू शकतात. पाणी, धूळ आणि रोजच्या वापरामुळे नोटा लवकर खराब होण्याचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः सतत हाताळल्या जाणाऱ्या दहा आणि वीस रुपयांच्या नोटांसाठी हा बदल उपयुक्त ठरू शकतो.

आकारमान तेच ठेवणार?

पॉलिमर नोटांचे आकारमान सध्याच्या कागदी नोटांप्रमाणेच ठेवण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे एटीएममधील नोटा स्वीकारणाऱ्या यंत्रणांमध्ये बदल करण्याचा खर्च टाळता येऊ शकतो. या प्रकल्पासाठी सहा कंपन्यांकडून निविदा प्राप्त झाल्याची आहे. असे असले तरी आकारमानाबाबत RBI कडून अधिकृत अंतिम घोषणा झालेली नाही. मनी कंट्रोलने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

एप्रिल 2027 पासून चाचणीची शक्यता

पॉलिमर नोटांसाठी एप्रिल 2027 पासून चाचणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. या नोटांसाठी बायॲक्सियली ओरिएंटेड पॉलिप्रोपिलिन म्हणजेच बीओपीपी  नावाचा विशेष पॉलिमर पदार्थ वापरण्याची तयारी आहे. भारतीय हवामान, तापमान आणि प्रत्यक्ष वापरातील परिस्थितीत नोटा किती टिकतात, याची तपासणी केली जाणार आहे.

सध्याच्या कागदी नोटा बंद होणार का?

नव्या पॉलिमर नोटा आल्या तरी सध्याच्या कागदी नोटा बंद होणार नाहीत. केंद्र सरकारने संसदेत स्पष्टता दिली आहे. पॉलिमर नोटा कागदी नोटांसोबतच चलनात आणण्याचा प्रस्ताव आहे. कागदी चलन पूर्णपणे बदलण्याची कोणतीही योजना सध्या नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्याकडील दहा आणि वीस रुपयांच्या नोटांबाबत चिंता करण्याची गरज नाही. चाचणी यशस्वी झाल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. आरबीआयचा हा प्रयोग यशस्वी झाला, तर दैनंदिन व्यवहारातील छोट्या नोटा अधिक टिकाऊ होऊ शकतात. मात्र, सध्या हा प्रकल्प चाचणीच्या टप्प्यात असून प्रत्यक्ष चलनात येण्यासाठी अजून काही प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES