SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

रिटायर कर्मचाऱ्यांना लागली बंपर लॉटरी! व्याजासहित 33.95 लाखांची ग्रॅच्युइटी मिळणार

रिटायर कर्मचाऱ्यांना व्याजासहित 33.95 लाखांची ग्रॅच्युइटी मिळणार आहे. एका प्रकरणात सेवानिवृत्तीनंतर यांची ग्रॅच्युइटी रोखण्यात आली होती.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 22, 2026, 22:51 IST | Updated: Nov 22, 2026, 22:59 IST
Join

ग्रॅच्युइटी : रिटायर कर्मचाऱ्यांना  बंपर लॉटरी लागणार आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळते. एका सेवानिवृत्त कर्मचारीला आपल्या ग्रॅच्युइटीसाठी  कायदेशीर लढाई करावी लागली.  अशाच एका प्रकरणात, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली विकास प्राधिकरणाच्या (DDA) दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने व्याजासह सुमारे 33.95 लाख रुपयांची ग्रॅच्युइटी देण्याच्या आदेशाला कायम ठेवले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 16 नोव्हेंबर रोजी एक अत्यंत महत्वाचा निर्णय दिला.  डीडीएची दोन्ही अपील सर्वोच्च न्यायालयाने  फेटाळून लावले. कनिष्ठ न्यायालयाने कर्मचाऱ्यांना निर्दोष ठरवले असल्याने आणि त्या निर्णयावर कोणतीही स्थगिती नसल्याने, केवळ पुढील कायदेशीर कार्यवाही प्रलंबित आहे या कारणास्तव त्यांची ग्रॅच्युइटी अनिश्चित काळासाठी रोखून धरता येणार नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, अशा स्थितीत कर्मचाऱ्यांनी लेखी हमीपत्र देणे आवश्यक आहे. जर पुढील कायदेशीर कार्यवाहीतील निर्णय त्यांच्या विरोधात गेला, तर ते व्याजासह रक्कम परत करावी लागणार आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

राजेंद्र कुमार शर्मा आणि सत्येंद्र पाल अशी तक्रारदारांची नावे आहेत. दोघेही डीडीएचे माजी कर्मचारी आहेत.  राजेंद्र कुमार शर्मा आणि सत्येंद्र पाल हे 1984 मध्ये डीडीएमध्ये रुजू झाले. शर्मा 2021 मध्ये, तर पाल 2018 मध्ये सेवानिवृत्त झाले. 2001 सालच्या एका भ्रष्टाचार प्रकरणामुळे दोघांचीही ग्रॅच्युइटी रोखण्यात आली होती. झोपडपट्टीवासीयांच्या सर्वेक्षणात बनावट नावांचा समावेश केल्याचा आरोप करण्यात आला होता.

फेब्रुवारी 2017 मध्ये, एका विशेष न्यायालयाने दोघांची निर्दोष मुक्तता केली. असे असले तरी दिल्ली सरकारने या निर्णयाला आव्हान देण्यासाठी उच्च न्यायालयात परवानगी मागितली. प्रलंबित कार्यवाहीचे कारण देत, डीडीएने शर्मा यांची 18,52,224 रुपयांची आणि पाल यांची 15,43,113 रुपयांची ग्रॅच्युइटी रोखून धरली.

सर्वोच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?

ग्रॅच्युइटी न मिळाल्याने, दोन्ही कर्मचाऱ्यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (CAT) धाव घेतली. जानेवारी 2026 मध्ये, न्यायाधिकरणाने व्याजासह रक्कम देण्याचा आदेश दिला. दिल्ली उच्च न्यायालयाने मार्च 2026 मध्ये हा निर्णय कायम ठेवला. यानंतर, डीडीएने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

16 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने कर्मचाऱ्यांना सत्र न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. त्या निर्णयावर कोणतीही स्थगिती नाही, तेव्हा केवळ अपील प्रक्रिया प्रलंबित आहे म्हणून त्यांची ग्रॅच्युइटी थांबवता येणार नाही.

पैसे परत करण्याची अट का घालण्यात आली?

सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना त्यांचा बोनस मिळवण्यासाठी अनिश्चित काळापर्यंत वाट पाहावी लागू नये. तथापि, सरकारी निधीचे संरक्षण करण्यासाठी, भविष्यात त्यांच्याविरुद्ध कायदेशीर निर्णय झाल्यास, व्याजासहित रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES