SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'वंदे मातरम'ची ची सर्व सहा कडवी गाण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान; केंद्राला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

राष्ट्रीय गीत वंदे मातरमची सर्व सहा कडवी औपचारिक शासकीय कार्यक्रमांमध्ये गाणे बंधनकारक करणाऱ्या केंद्र सरकारच्या आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 27, 2026, 04:23 PM IST | Updated: Oct 27, 2026, 04:27 PM IST
Image Credit: 'वंदे मातरम'ची ची सर्व सहा कडवी गाण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान
Join

राष्ट्रीय गीत वंदे मातरमची सर्व सहा कडवी औपचारिक शासकीय कार्यक्रमांमध्ये गाणे बंधनकारक करणाऱ्या केंद्र सरकारच्या आदेशांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली.

केंद्र सरकारच्या दोन आदेशांना आव्हान

केंद्रीय गृह मंत्रालयाने 28 जानेवारी आणि 9 जुलै 2026 रोजी राष्ट्रीय गीत व राष्ट्रगीताच्या गायनासंदर्भात आदेश जारी केले होते. या आदेशांनुसार, औपचारिक शासकीय कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची सर्व सहा कडवी गाण्याची तरतूद करण्यात आली आहे.या आदेशांना नागपूरमधील बौद्ध कार्यकर्ते आणि नागरी हक्कांसाठी काम करणारे बी. डी. बोरकर तसेच माजी आयएएस अधिकारी बालकृष्णन सत्यभामा मावोजी यांनी स्वतंत्र याचिकांद्वारे आव्हान दिले आहे.

आदेश इस्लामविरोधी असल्याचा आरोप

बोरकर यांनी आपल्या याचिकेत केंद्र सरकारचे हे आदेश इस्लामविरोधी असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या मते, गेल्या 79 वर्षांपासून प्रचलित असलेली वंदे मातरमच्या दोन कडव्यांची परंपरा बदलून संपूर्ण गीत गाण्याची सक्ती करणे अयोग्य आहे.

दोन कडव्यांच्या प्रचलित आवृत्तीत धार्मिक देवतांचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. मात्र, संपूर्ण गीतातील काही भाग मुस्लिमविरोधी आशयाचा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

'वंदे मातरम्‌'च्या ऐतिहासिक संदर्भावर प्रश्न

वंदे मातरमचे लेखक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत 1870 च्या दशकाच्या सुरुवातीला लिहिल्याचा उल्लेख याचिकेत आहे. त्यानंतर हे गीत त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत समाविष्ट करण्यात आले. दोन कडव्यांची स्वतंत्र आवृत्ती आणि कादंबरीतील संपूर्ण गीत यांच्यात ऐतिहासिक व आशयाच्या दृष्टीने फरक असल्याचा दावा बोरकर यांनी केला आहे.

दरम्यान, माजी आयएएस अधिकारी बालकृष्णन सत्यभामा मावोजी यांनी संपूर्ण वंदे मातरमला 'धार्मिक युद्धगीत' असे संबोधले आहे. या दोन्ही याचिकांवरील सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारचे उत्तर आणि न्यायालयाची पुढील भूमिका याकडे आता लक्ष लागले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES