SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

वीज बिलात ट्रॅफिक दंड जोडण्याची सुप्रीम कोर्टाच्या सूचना; थकबाकीदार वाहनांवर निर्बंधांचा प्रस्ताव

ई-चलनांची मोठी थकबाकी वसूल करण्यासाठी ती रक्कम वीजबिलाशी जोडण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत. देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे सुमारे 20 हजार कोटी रुपयांची ई-चलन थकबाकी असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली.

Written By Vanita Kamble Edited By Vanita Kamble
Published: Sep 29, 2026, 10:59 PM IST | Updated: Sep 29, 2026, 11:03 PM IST
Join

ई-चलन : वाहतूक नियम मोडला तर लगेच ई-चलनद्वारे दंड लागू होतो. काही तो भरतात मात्र, अनेकजण दंड भरत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणात ई चलनचा दंड थकीत वसूल करायचा कसा, हा मोठा प्रश्न होता. देशभरात तब्बल 45 हजार कोटी रुपयांचं ई-चलन दंड थकीत आहे. त्याची वसुली करण्यासाठी आता थेट सर्वोच्च न्यायालयानंच उपाय सुचवलाय. यावेळी न्यायालयानं काय म्हटलंय. 

ट्रॅफिकचे नियम मोडले, ई-चलन आलं पण दंड भरला नाही, तर सावधान. आता तुमच्या अडचणी वाढू शकतात! थकीत वाहतूक दंडाच्या वसुलीसाठी सर्वोच्च न्यायालयानं सोमवारी महत्त्वाच्या सूचना केल्या. थकीत ई-चलनांची रक्कम वीज बिलात जोडण्याचा विचार राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी करावा, असं न्यायालयानं सुचवलं. केवळ ई-चलन जारी करून उपयोग नाही, तर त्यातून आकारलेला दंड प्रत्यक्षात वसूल झाला पाहिजे, असं निरीक्षण न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांनी नोंदवलं.

45 हजार कोटी रुपयांची एकूण वसुली आहे.  25 हजार कोटी रुपये वसूल झाल्याची माहिती आहे.  थकबाकी वसूल करण्यासाठीन्यायालयानं अनेक पर्याय सुचवलेत. वाहनाच्या नोंदणी प्रमाणपत्राचं नूतनीकरण, मालकी हस्तांतरण आणि इतर वाहन-संबंधित सेवांवर निर्बंध घालण्याचा विचार केला जात आहे. थकीत चलन असलेल्या वाहनांना परिवहन पोर्टलवर ब्लॅकलिस्ट करण्याची सूचना देण्यात आली आहे. 

इतकंच नाही, तर थकीत दंड असलेल्या वाहनांची रस्त्यांवर अचानक तपासणी करण्याचाही प्रस्ताव आहे. तपासणीदरम्यान ई-चलन भरलेलं नसल्याचं आढळल्यास, संबंधित वाहन जप्त करण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची सूचना न्यायालयानं केली. याशिवाय, फिटनेस प्रमाणपत्र, पीयूसी प्रमाणपत्र आणि वाहन चालवण्याच्या परवान्याच्या नूतनीकरणावर निर्बंध घालण्याबाबतही चर्चा झाली. मात्र, या उपाययोजना प्रत्यक्षात लागू करण्यासाठी संबंधित राज्यांनी कायदेशीर तरतुदी आणि अंमलबजावणीची प्रक्रिया विचारात घेणं आवश्यक असेल.

2012 मध्ये दाखल झालेल्या रस्ते सुरक्षेशी संबंधित जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान या सूचना करण्यात आल्या. मोटार वाहन कायदा 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासंदर्भातील अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. थोडक्यात, ई-चलन काढून जबाबदारी संपत नाही, तर दंडाची वसुलीही झाली पाहिजे, यावर सर्वोच्च न्यायालयाने भर दिला आहे.

मात्र, एक महत्त्वाची बाब म्हणजे वीज बिलात थकीत ट्रॅफिक दंड जोडण्याची सूचना ही न्यायालयाने मांडलेली संकल्पना आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे आता थकीत चलनची रक्कम थेट तुमच्या वीज बिलात जोडली जाण्याचा निर्णय होतो का ? पहावं लागणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES