• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /महिलांनो सावधान! Online मागवलेली साडी Return करताच ₹99518 बँक बॅलेन्स ₹0 झाला; नेमकं तिच्यासोबत घडलं काय?

महिलांनो सावधान! Online मागवलेली साडी Return करताच ₹99518 बँक बॅलेन्स ₹0 झाला; नेमकं तिच्यासोबत घडलं काय?

तिने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन एक साडी मागवली आणि मात्र प्रत्यक्षात साडी पाहिल्यावर ती न आवडल्याने रिटर्न पॉलिसीनुसार परत करण्याचा निर्णय तिने घेतला आणि त्यानंतर तिच्यासोबत जे काही घडलं ते पाहून धक्का बसल्याशिवाय राहणार नाही...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 28, 2026, 03:03 PM IST|Updated: Oct 28, 2026, 03:21 PM IST
joinshare
महिलांनो सावधान! Online मागवलेली साडी Return करताच ₹99518 बँक बॅलेन्स ₹0 झाला; नेमकं तिच्यासोबत घडलं काय?
Image Credit: महिलेला बसला आर्थिक फटका (प्रातिनिधिक फोटो, एआयवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

शिवसेनेत फूट का पडली? शिंदेंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून ठाकरेंचे वकिल हसले; असं म्हणाले तरी काय?

2

अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीने उधळला गुलाल! किरण सरनाईक यांचा सलग दुसऱ्यांदा विजय

3

केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी! महागाई भत्त्यात वाढ, मोदी सरकारने मंजूर केले 10016 कोटी

4

दिवाळीचा पहिला सण वसुबारस; काय आहे परंपरा, तिथी, पूजा विधी आणि मुहूर्त जाणून घ्या

5

20 लाखांची कचोरी! भारतभर चर्चेत असलेला Viral Video पाहिला का? गाडीवरुन पाठलाग करण्याऐवजी...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

उत्तर प्रदेशमध्ये एका विचित्र घटनेमध्ये ऑनलाइन मागवलेल्या साडीच्या माध्यमातून महिलेची जवळपास एक लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. हा सारा प्रकार इटावा येथे राहणाऱ्या महिलेसोबत तिने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरुन केलेल्या खरेदीनंतर पसंत न पडलेली साडी परत करताना ही फसवणूक झाली. या फसवणुकीमध्ये महिलेला 99 हजार 518 रुपयांचा फटका बसला असून हे सर्व पैसे तिने गमावले आहेत.

नक्की झालं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, इटावा जिल्ह्यातील बसैयाहार गावच्या रहिवासी असलेल्या आकांक्षाने 'फ्लिपकार्ट'वरून 674 रुपयांना एक साडी खरेदी केली होती. ऑनलाइन आवडलेली मात्र प्रत्यक्षात समोर आल्यानंतर तिला ती साडी आवडली नाही, म्हणून तिने ती साडी रिटर्न पॉलिसीअंतर्गत परत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिला गंडवण्यात आलं. तिच्या मोबाईलशी संलग्न बँक खात्यात असलेली आणि तिने कष्टाने वाचवलेली सर्व रक्कम काही क्षणांमध्ये लुटली गेली. मिळालेल्या माहितीनुसार, साडी परत केल्यानंतर आकांक्षाने परताव्यासाठी (रिफंड) रिक्वेस्ट केली आणि सात दिवसांमध्ये पैसे परत मिळतील याची वाट पाहिली. मात्र सात दिवसांनंतरही जेव्हा तिच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत, तेव्हा तिने ऑर्डरशी संबंधित एका ग्राहक सेवा क्रमांकावर फोन केला.

स्क्रीन शेअर करायला सांगितलं

ज्या व्यक्तीला फोन केलेला त्या व्यक्तीने आकांक्षाला तिच्या मोबाईलची स्क्रीन शेअर करायला सांगितली. तिला मिळालेले एक 'गिफ्ट कार्ड' उघडण्यास सांगितले. स्क्रीन शेअर करायला लावून आणि गिफ्ट कार्ड उघडायला सांगून, त्या भामट्याने आकांक्षाच्या फोनचा ताबा मिळवला. त्यानंतर, पाच वेगवेगळ्या व्यवहारांतून त्याने तिच्या बँक खात्यातील सर्व पैसे काढून घेतले. पहिल्या दोन व्यवहारांत प्रत्येकी 10 हजार रुपये काढले गेले. तिसऱ्या व्यवहारात 19999 रुपये काढले गेले. यानंतर, फसवणूक करणाऱ्याने आणखी 55 हजार रुपये काढून घेतले. शेवटच्या व्यवहारात 4495 रुपये तिच्या खात्यातून काढून घेण्यात आले.

खात्यावर एकही पैसा नाही

आकांक्षाचं या व्यक्तीशी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान बोलणे झाले होते. संध्याकाळी जेव्हा तिने आपल्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासली, तेव्हा तिला समजले की खात्यात एकही रुपया उरलेला नाही. तिने तातडीने याबद्दल आपल्या वडिलांना सांगितले. ते बँकेत पोहोचले, परंतु तोपर्यंत बँकेची शाखा बंद झाली होती. खात्यातील ही रक्कम कुटुंबाने आकांक्षाच्या लग्नासाठी आणि घरात पाण्याचा पंप बसवण्यासाठी साठवून ठेवली होती. आता हे कुटुंब आपल्या आयुष्यभराची बचत परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी या कुटुंबाकडून केली जात आहे.

पोलिसांनी तपास का सुरु केला नाही?

या कुटुंबाने अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवलेली नाही. त्यांनी आश्वासन दिले की, तक्रार दाखल झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असं  या प्रकरणी लावेदी पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव कुमार यांनी सांगितलं.  कुटुंबाकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर, सायबर गुन्ह्यांशी संबंधित तरतुदींनुसार या प्रकरणाचा तपास केला जाईल, असंही कुमार यांनी स्पष्ट केले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Cyclone Alert
crime