SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सिंहाचा बाईकवरुन पाठलाग करणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना घडली जन्माची अद्दल, पाहा VIDEO

गुजरातच्या अंबार्डी सफारी पार्कमध्ये वनविभागाचे कर्मचारी दुचाकी आणि बोलेरो एसयूव्हीवरून एका सिंहाचा पाठलाग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 16, 2026, 21:15 IST | Updated: Nov 16, 2026, 21:26 IST
Image Credit: वनअधिकाऱ्यांनी बाईकवरुन केला सिंहाचा पाठलाग
Join

गुजरातच्या अंबार्डी सफारी पार्कमधील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये बाईकस्वार आणि एक बोलेरो गाडी कोणतीही भीती न बाळगता सिंहाच्या भोवती फिरत असून त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत. सिंहाला अशाप्रकारे त्रास दिला जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करत प्रश्नही विचारले. दरम्यान वन विभागाने स्पष्ट केले आहे की, सिंहाला त्याच्या परिसरात परत नेले जात होते. मात्र, या प्रक्रियेदरम्यान लागू केलेल्या नियमावलीचे पालन केले गेले नाही. परिणामी, तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

या छोट्या व्हिडीओत वनविभागाचे तीन कर्मचारी दुचाकीवरून सिंहाच्या सोबत जाताना दिसत आहेत, तर एक बोलेरो एसयूव्ही (SUV) देखील त्याच्या मागे जात असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडीओमुळे वन्यजीव प्रेमी आणि सिंहप्रेमी चिंता व्यक्त करु लागले होते. सिंहाचा अशाप्रकारे पाठलाग का केला जात होता, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सफारी पार्कमध्ये खासगी वाहनांना प्रवेश मिळणे निषिद्ध असतानाही कर्मचारी नियम डावलत होते का? अशी विचारणाही करण्यात आली.

व्हिडीओवरुन टीका होत असताना वन विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. गिर पूर्व वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक (ACF) अमित वानिया यांनी सांगितले की, कर्मचारी सिंहाला त्रास देण्याचा प्रयत्न करत नव्हते, तर त्याला त्याच्या ठरलेल्या बंदिस्त जागेकडे नेण्याचा प्रयत्न करत होते. या जागेला क्राल (Kraal) असे म्हणतात.

 

 

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अंबाडी सफारी पार्कमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होती. संध्याकाळी सफारी संपल्यानंतर, सिंहांनी त्यांच्या 'क्राल'मध्ये परतणे अपेक्षित होते. मात्र, त्यापैकी एक सिंह ठरलेल्या जागेकडे जाण्याऐवजी दुसऱ्याच दिशेने जाऊ लागला.

सिंहाला थांबवण्याच्या हेतूने आणि त्याला पुन्हा त्याच्या बंदिस्त जागेकडे (क्रालकडे) परत नेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केला. वन विभागाच्या म्हणण्यानुसार, सिंहाला त्रास दिला गेल्याची कोणतीही कृती आढळली नाही. कर्मचारी केवळ आपली कर्तव्ये पार पाडत होते, जेणेकरून सिंह पुन्हा त्याच्या निर्धारित क्षेत्रात परत जाऊ शकेल.

तरीही, वन विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, या घटनेच्या पुढील चौकशीचा भाग म्हणून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे. तसंच प्रोटोकॉलचे पालन केले गेले नाही, तीन कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे.

कर्मचाऱ्यांना काढून टाकलं

पीसीसीएफ जयपाल सिंग यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसलेले तिन्ही कर्मचारी कंत्राटी कर्मचारी होते आणि त्यांना काढण्यात आले आहे. ते म्हणाले की, सिंहांना त्यांच्या नेमून दिलेल्या क्षेत्रात परत आणण्यासाठी एक ठरलेली कार्यपद्धती आहे, ज्याचे या प्रकरणात पालन केले गेले नाही. पीसीसीएफच्या म्हणण्यानुसार, सिंहांना सहसा बंद जीपमधून त्यांच्या परिसरात नेले जाते. या प्रकरणात, कार्यपद्धतीचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES