SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बॉसने व्हॉट्सअ‍ॅपवर ‘OK’ म्हटलं,2 दिवसांच्या सुट्टीनंतर आलेला कर्मचारी सस्पेंड; काय घडलं नेमकं?

बॉसने व्हॉट्सअ‍ॅपवर ‘OK’ म्हटलं म्हणजे रजा मंजूर झालीच असं नाही! रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रकरणात CAT ने काय सांगितलं आणि नोकरी करणाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी? जाणून घेऊया.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 24, 2026, 09:58 PM IST | Updated: Oct 24, 2026, 10:06 PM IST
Image Credit: कर्मचारी निलंबित
Join

ऑफिसमध्ये बॉसला व्हॉट्सअ‍ॅपवर रजेचा मेसेज पाठवला आणि समोरून ‘OK’ असा रिप्लाय आला की अनेक कर्मचारी रजा मंजूर झाल्याचे गृहीत धरतात. पण केवळ या दोन अक्षरांवर विश्वास ठेवणे महागात पडू शकते. उत्तर प्रदेशातील एका रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रकरणात केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (CAT) महत्त्वाची भूमिका मांडली आहे. व्हॉट्सअ‍ॅप वरील ‘OK’ हा मेसेज म्हणजे सक्षम अधिकाऱ्याने रजा अधिकृतपणे मंजूर केल्याचा निर्णायक पुरावा ठरत नाही, असे न्यायाधिकरणाने स्पष्ट केले. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

तीन दिवसांची रजा घेतली, आणखी दोन दिवस मागितले

हे प्रकरण उत्तर मध्य रेल्वेतील कर्मचारी प्रिया रंजन कुमार यांच्याशी संबंधित आहे. ते प्रयागराज येथे कार्यरत होते. त्यांनी 14 ते 16 जुलै 2025 या कालावधीत गावी जाण्यासाठी तीन दिवसांची रजा घेतली होती. त्यानंतर 17 आणि 18 जुलै या आणखी दोन दिवसांची रजा मिळावी, अशी विनंती त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर वरिष्ठ अधिकाऱ्याला केली. संबंधित अधिकाऱ्याने ‘OK’ असा प्रतिसाद दिल्याने रजा मंजूर झाल्याचे आपण समजल्याचा दावा कर्मचाऱ्याने केला.

कार्यालयात परतताच निलंबन; चार दिवसांत बदली

कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 21 जुलै 2025 रोजी कामावर परतल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यानंतर 25 जुलै रोजी त्यांची प्रयागराजहून फतेहपूर येथे बदली करण्यात आली. 31 जुलै रोजी त्यांना विभागीय कारवाईशी संबंधित आरोपपत्रही देण्यात आले. ही बदली रजेच्या वादातून सूडबुद्धीने करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी न्यायाधिकरणात धाव घेतली. मात्र, रेल्वे प्रशासनाने बदलीमागे प्रशासकीय कारण असल्याचे सांगितले.

व्हॉट्सअ‍ॅप वरील ‘OK’ पुरेसा का ठरला नाही?

रेल्वे प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, संबंधित काळात रजा मंजूर करण्याची जबाबदारी दुसऱ्या सक्षम अधिकाऱ्याकडे होती. तसेच रजेची मंजुरी रेल्वेच्या निर्धारित प्रक्रियेनुसार एचआरएमएस पोर्टलवरून घेणे आवश्यक होते. त्यामुळे केवळ व्हॉट्सअ‍ॅप वरील उत्तरावरून अधिकृत मंजुरी मिळाली, असे मानता येणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने मांडली.


बदलीला शिक्षा मानण्यासही नकार

कर्मचाऱ्याने बदली ही त्याच्यावरील कारवाईचा भाग असल्याचा आरोप केला. दुसरीकडे, फतेहपूर रेल्वे स्थानकावर नवीन प्रवेश आणि तिकीट बुकिंग कार्यालय विकसित करण्यात आले असून, तेथे कर्मचाऱ्यांची गरज असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. बदलीसाठी प्रशासकीय समितीची शिफारस आणि सक्षम अधिकाऱ्याची मंजुरी असल्याचेही प्रशासनाने मांडले. न्यायाधिकरणाला बदली सूडबुद्धीने करण्यात आल्याचे सिद्ध करणारे पुरेसे ठोस पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे 7 ऑक्टोबर 2026 रोजी याचिका फेटाळण्यात आली.

कर्मचाऱ्यांनी काय लक्षात ठेवावे?

या प्रकरणातून नोकरी करणाऱ्यांसाठी स्पष्ट धडा मिळतो. रजेचा अर्ज पाठवणे आणि रजा मंजूर होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर ‘OK’ असा प्रतिसाद मिळाल्यास त्याचा अर्थ स्पष्ट करून घ्यावा. रजा मंजूर करण्याचा अधिकार संबंधित अधिकाऱ्याकडे आहे का, हे तपासावे आणि कार्यालयाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा निर्धारित पद्धतीने मंजुरीची नोंद झाली आहे का, याची खात्री करावी, असे आवाहन तज्ज्ञ करतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES