• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /महाराष्ट्रात गुटख्याप्रमाणे आता फटाक्यांच्या विक्रीवरही कायमची बंदी? मुंबई हायकोर्टात नेमकं काय घडलं?

महाराष्ट्रात गुटख्याप्रमाणे आता फटाक्यांच्या विक्रीवरही कायमची बंदी? मुंबई हायकोर्टात नेमकं काय घडलं?

गुटख्याप्रमाणे महाराष्ट्रात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी मुंबई हायकोर्टात करण्यात आली. दिवाळीतील आगीच्या घटना आणि प्रदूषणाची दखल घेत न्यायालयाने निकाल राखून ठेवलाय.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 20, 2026, 06:37 IST|Updated: Nov 20, 2026, 06:48 IST
joinshare
महाराष्ट्रात गुटख्याप्रमाणे आता फटाक्यांच्या विक्रीवरही कायमची बंदी? मुंबई हायकोर्टात नेमकं काय घडलं?
Image Credit: मुंबई हायकोर्ट

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

आता PF मधूनही दरमहा मिळणार पैसे! EPFO चा मोठा निर्णय; निवृत्तीनंतर एकरकमी पैसे काढण्याची गरज नाही?

2

ठाणे महापालिकेतील स्थायी समितीची सभासदांची नावे जाहीर, कोणाला मिळाली संधी?

3

बिहारमधून नाशिकमध्ये आले, यादव आडनाव बदलून जाधव केलं; पण एका मोबाईलने सगळा संसार मोडला; ओढणीने गळा आवळून...

4

भयंकर! नातवाने आजीचा जीव घेतला; मृतेदह गोणीत भरून धरणात फेकला, कारण ऐकून पोलिसही हादरले

5

यशस्वी जयस्वालने गौतम गंभीरला टाकलं मागे, न्यूझीलंड टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी मोठा कारनामा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

महाराष्ट्रात गुटख्याच्या विक्रीवर बंदी आहे, मग फटाक्यांच्या विक्रीवरही अशीच बंदी का घालू नये? असा महत्त्वाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान उपस्थित करण्यात आला. दिवाळीत मुंबईत 300 हून अधिक आगीच्या घटना, वाढते वायू प्रदूषण आणि ध्वनिप्रदूषण यांची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. फटाक्यांच्या वापरावर सध्याचे निर्बंध असूनही त्यांचे उल्लंघन होत असेल, तर अधिक कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे न्यायालयाने सुनावले. फटाके विक्री प्रश्नी मुंबई हायकोर्टात नेमकं काय घडलं? सविस्तर जाणून घेऊया.

गुटख्याप्रमाणे फटाक्यांच्या विक्रीवर बंदीची मागणी

याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील संजीव गोर्वधनकर यांनी न्यायालयात फटाक्यांच्या विक्रीवर संपूर्ण महाराष्ट्रात बंदी घालण्याची मागणी केली. महाराष्ट्रात गुटख्याच्या विक्रीवर बंदी लागू आहे. त्याच धर्तीवर सार्वजनिक आरोग्याचा विचार करून फटाक्यांच्या विक्रीवरही बंदी घालण्याचा विचार करावा, असा युक्तिवाद त्यांनी केला. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि आरोग्यावरील परिणाम लक्षात घेता केवळ वापरावर नियंत्रण ठेवणे पुरेसे नसल्याचे त्यांनी मांडले.

दिवाळीत 350 आगीच्या घटना

दिवाळीदरम्यान मुंबईत फटाक्यांमुळे सुमारे 350 आगीच्या घटना घडल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. ही संख्या चिंताजनक असल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. फटाक्यांमुळे केवळ धूर आणि आवाज निर्माण होत नाही, तर इमारती, वाहने आणि नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. फटाके फोडण्याच्या वैयक्तिक आनंदासाठी इतरांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण करणे योग्य नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबईत फटाके फोडण्यावर पूर्ण बंदीचा पर्याय

न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने मुंबईत फटाके फोडण्यावर व्यापक बंदी घालण्याचा पर्याय सुचवला. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही, तर सार्वजनिक ठिकाणी किंवा घराजवळ फटाके फोडण्याऐवजी केवळ निश्चित केलेल्या मैदानांवर सामूहिक आतषबाजीला मर्यादित वेळेसाठी परवानगी देण्याचा विचार होऊ शकतो. परदेशातील काही ठिकाणी अशा पद्धतीने आतषबाजी केली जाते, याचाही संदर्भ न्यायालयाने दिला.

पोलिसांची कारवाई तरीही नियमांचे उल्लंघन

राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडताना सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी दिवाळीदरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. जवळपास 500 गुन्हे दाखल करण्यात आले असून नियमभंग करणाऱ्यांना इशारे देण्यात आले आणि 20 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे फटाके जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, संपूर्ण महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घालणे हा योग्य पर्याय नसल्याचे राज्य सरकारच्या वतीने मांडण्यात आले.

न्यायालयाच्या आदेशाकडे लक्ष

फटाक्यांच्या विक्रीवर बंदी, सामूहिक आतषबाजीसाठी स्वतंत्र ठिकाणे आणि सध्याच्या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध पर्यायांवर सुनावणीदरम्यान चर्चा झाली. न्यायालयाने प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना होणाऱ्या त्रासाचाही उल्लेख केला. प्रत्येक नागरिकाला घरात एअर प्युरिफायर लावणे शक्य नाही, असे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. या प्रकरणात न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवलाय. त्यामुळे महाराष्ट्रात फटाक्यांच्या विक्रीवर बंदी येणार की केवळ वापरावर अधिक कठोर निर्बंध लागू होणार, हे अंतिम आदेशानंतरच स्पष्ट होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india