SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State
LIVE NOW

LIVE UPDATES: सत्याचा शोध घेताना संघर्ष करावा लागतो- रोहित पवार

Maharashtra Breaking News Today LIVE 16 November 2026: महाराष्ट्रासह देशभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 16, 2026, 16:25 IST | Updated: Nov 16, 2026, 17:09 IST
Image Credit: लाईव्ह अपडेट्स
Join

Maharashtra Breaking News Today LIVE 16 November 2026: अजितदादांच्या विमान अपघातामागे घातपात आहे का? याप्रश्नी रोहित पवार पत्रकार परिषद घेतायत.कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच AI ची नजर असणार आहे. दादांच्या पुतळा अनावरणाचा कार्यक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मर्यादित जागेत होता या कार्यक्रमाला न जाण्यामागे तसं काही खास कारण नाही, असे सुनील तटकरे म्हणाले.

16 Nov 2026 17:09 IST

मला राजकीय किंमत मोजावी लागेल तरी मफलरवाल्या नेत्याचे नाव सांगणार- रोहित पवार

 

स्वतःच्या काकाला न्याय देवू शकत नसेल तर मग गरिबांना कसा न्याय देवू शकेन. यासाठी मला राजकीय किंमत मोजावी लागेल. माझे घरचे टेन्शनमध्ये आहेत. दादाला सोडले नाही तर तुला कसे सोडतील असं त्यांचे मत आहे. राजकारणात पदासाठी आलो नाही. ज्या व्यक्तीचे नाव घेणार आहे, ती व्यक्ती दादांच्या घातपातामागे आहे असे मी म्हणत नाही. व्हीएसआर कंपनीला मात्र तो वाचवत आहे.

16 Nov 2026 16:59 IST

'एक बिहारी सबपर भारी!’ शिवसेना जिल्हाप्रमुखाचा मनसेला अप्रत्यक्ष टोला!




कल्याणमधील दुर्गाडी येथील गणेश घाटावर छठपूजेचा भव्य कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे यांनी उपस्थिती लावली.यावेळी बोलताना त्यांनी, “एक बिहारी माणूस दोन ते तीन जणांचे काम एकटाच करतो,” असे विधान केले. मराठी-अमराठी वादाच्या काळात उत्तर भारतीय नागरिक गावी परतल्याने उद्योगधंदे ठप्प झाले होते, असा दावा त्यांनी केला. बांधकाम व्यवसायावरही याचा परिणाम झाल्याचे मोरे यांनी सांगितले. त्यांच्या या विधानातून मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावल्याची चर्चा कल्याणच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच छठपूजेच्या सणाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली

16 Nov 2026 16:56 IST

मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा अखेर सुरू

 

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहू प्रतीक्षित चिपी विमानतळावर अखेर नवी मुंबई ते सिंधुदुर्ग अशी विमान सेवा सुरु झाली. 15 वर्षापूर्वी भूमी पूजन झालेल्या चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावर विमानसेवा सुरळीत सुरु होण्याची प्रतीक्षा सर्वच कोकणवासियांना होती. आणि आज बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून नवी मुंबई ते चिपी अशी फ्लाय 91 ची विमान सेवा सुरु झालीय.

16 Nov 2026 16:54 IST

अकोल्यात हिट अँड रन प्रकरणाचा ६ तासांत उलगडा


 

अकोल्यातील जुन्या इनकम टॅक्स चौकात ६५ वर्षीय सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण मेतकर यांना धडक देऊन पसार झालेल्या वाहनचालकाला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या ६ तासांत जेरबंद केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीसह अपघातात वापरलेले वाहनही ताब्यात घेतले आहे. या अपघातात सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

16 Nov 2026 16:53 IST

एक तासापासून सोलापूर धुळे महामार्गावर चक्काजाम, शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 'स्वाभिमानी' रस्त्यावर

 


शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी चौकात
लातूर-सोलापूर-धुळे महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे. गेल्या एक तासापासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.विशेष म्हणजे, जेवणाखाण्याची तयारी आणि आंदोलनासाठी लागणारं साहित्य सोबत घेऊनच कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा, विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

16 Nov 2026 16:51 IST

बारामतीत दोन गटांत राडा, वाहनांच्या काचा फोडून दहशत

 

बारामती शहरातील पाटस रोड परिसरात सराफ पेट्रोल पंपाशेजारी दोन गटांमध्ये जोरदार भांडण झालं,दोन गटांमध्ये झालेल्या वादातून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. हा वाद मिटवण्यासाठी पुढे आलेल्या एका व्यक्तीला ही बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून एक्स हँडल वर पोस्ट करीत शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बारामतीत अशी घटना घडणे अत्यंत चिंताजनक आहे असं म्हटलं आहे.

16 Nov 2026 16:48 IST

पाण्यासाठी महिलांचा ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा



हिंगोलीच्या गोरेगाव येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्यासाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढला आहे गोरेगाव गावात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपये खर्च करून जलजीवन मिशनचे काम करण्यात आलं आहे मात्र शासनाच्या योजनेच पाणी महिलांना मिळत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केल आहे जलजीवन मिशनवर कोट्यावधी रुपये खर्च करून नागरिकांना पाणी मिळत नसल्याने कामाची चौकशी करून नागरिकांना तात्काळ पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी महिलांनी केली आहे.

16 Nov 2026 16:47 IST

भिवंडीत भीषण आग, लोकांनी पळून वाचवला जीव



भिवंडी शहरातील धोबी तलाव परिसरात शाहिल हॉटेल जवळ सोमवारी ग्राउंड प्लस टू इमारतीला अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या ताज नमकच्या दुकानाच्या गोदामाला लागली. बघता बघता आगीने विक्राळ रूप धारण केलं. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांनी पळून आपला जीव वाचवला. स्थानिकांच्या शहाणपणामुळे मोठा अनर्थ टळला. 

16 Nov 2026 16:45 IST

RTI अधिकारातही माहिती मिळाली नाही- रोहित पवार

 


महाराष्ट्रात FIR दाखल झाला नाही .RTI अधिकारातही माहिती मिळाली नाही. सत्तेत असूनही स्मरणपत्र द्यावं लागलं, असे रोहित पवार म्हणाले. 

16 Nov 2026 16:37 IST

प्रफुल्ल पटेल, तटकरेंमुळे अजित पवार विमान मार्गे गेले- रोहित पवार

 

यापूर्वीही मी अनेक मुद्दे समोर आणले आहेत. विमानाने का जावे लागले हे कारण मी सांगितले आहे. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे ते रस्ते मार्गे न जाता विमानाने जावे लागले. जास्त प्रमाणात इंधन टॅंकमध्ये टाकले गेले होते. याप्रकरणी अद्याप एफआयआर झालेला नाही. व्हीएसआर कंपनी बंद करण्याची मागणी केली होती, असे रोहित पवार म्हणाले.

16 Nov 2026 16:32 IST

साडेनऊ महिने झाले, सीआयडीवर कुणाचा दबाव?- रोहित पवारांचा सवाल

 

साडेनऊ महिने झाले आहेत, तरीही काही झालेले नाही. शंकेचे निरसन सत्ताधारी करत नाहीयत. राजकारण केवळ बघायला मिळत आहे. सीआयडीवर कुणाचा दबाव आहे का?, सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी अजित पवार यांच्या पक्षाने केली होती. तरीही अजून काहीही झालेले नाही, असे रोहित पवार म्हणाले.

16 Nov 2026 16:29 IST

सत्याचा शोध घेताना संघर्ष करावा लागतो- रोहित पवार


अजितदादांच्या विमान अपघातामागे घातपात आहे का याचे उत्तर अजून मिळाले नाही. आतापर्यंत याविषयी मी पाच पत्रकार परिषदा घेतल्या आणि आजही ही सहावी पत्रकार परिषद आहे.सत्याचा शोध घेताना संघर्ष करावा लागतो, असे रोहित पवार म्हणाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES