)
देशातून लोकशाही संपवू देणार नाही., असे म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. मोदी-शाह यांना त्यांनी आपल्या रॅलीतून संदेश दिलाय. तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही, असे ते म्हणाले.
कोकणातील बळीराजावर निसर्गाचा दुहेरी घाला पडला आहे. कोकणाचं प्रमुख पीक असलेल्या भाताच्या मळणीला जागोजागी सुरुवात झाली असली, तरी शेतकऱ्यांच्या हाती केवळ निराशा आली आहे. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे भाताचे उत्पन्न निम्म्यावर आले असून लोंब्यांमध्ये दाण्यांऐवजी पोळ भरल्याचे चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे यंदा केवळ धान्याचीच नव्हे, तर जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पेंढा कमी पडल्याने गोशाळांसमोर आणि पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गडचिरोलीत सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सध्याच्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसी समाजाच्या मोजणीचा स्वतंत्र कॉलम असावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. स्थानिक शिवाजी महाविद्यालय मैदानातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आपल्या मागणीच्या समर्थनार्थ जिल्हाभरातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले. यापुढील काळात ओबीसींसाठीची योजना आणि तिची अंमलबजावणी यासाठी समाजाचा टक्का माहित असणे आवश्यक असल्याचे मत याप्रसंगी आयोजकांनी बोलून दाखविले. यासाठीच आगामी संसद अधिवेशन काळात दिल्लीत भव्य निदर्शन कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले.राज ठाकरे यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले. तर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पोहचले आहेत.स्मारकाच्या कामाची पाहणी आणि आढावा बैठकीसाठी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पोहचले आहेत. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली असून याचा आढावा उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून वारंवार घेतला जात आहे.
राहुल गांधी रामलीला मैदानावर पोहोचले आहेत.राहुल गांधी थोड्याच वेळात रामलीला मैदानातील मंचावर येणार आहेत.ओपन बस मध्ये बसून इंडिया आघाडीचे सर्व नेते निघाले. राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, ओपन बसमध्ये आहेत.संजय राऊत, मेहबूबा मुफ्ती, अभिषेक बॅनर्जी, तेजस्वी यादव दाखल झाले आहेत.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानावरून मार्च सुरू झालाय. ओपन बस मध्ये बसून इंडिया आघाडीचे सर्व नेते निघाले. राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, ओपन बसमध्ये आहेत. संजय राऊत, मेहबूबा मुफ्ती, अभिषेक बॅनर्जी, तेजस्वी यादव दाखल झाले आहेत.
LIVE Updates 1 November 2026 : इंडिया आघाडीचा मार्च सुरू झालाय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानावरून मार्च सुरू झालाय. गुन्हे शाखेकडून टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आलाय. मुख्य सूत्रधार अनिल पंडितने तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी बँक खात्यांचे जाळे विणल्याची माहिती देण्यात आली.