• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /₹15000 पगाराची नोकरी ते ₹94400 कोटींचा मालक... लग्नावर उडवले ₹200 कोटी, ही व्यक्ती आहे कोण? एवढा पैसा आला कुठून?

₹15000 पगाराची नोकरी ते ₹94400 कोटींचा मालक... लग्नावर उडवले ₹200 कोटी, ही व्यक्ती आहे कोण? एवढा पैसा आला कुठून?

Reported BySwapnil Ghangale
Published: Nov 04, 2026, 01:34 PM IST|Updated: Nov 04, 2026, 01:53 PM IST
joinshare
देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एकातील मुख्य आरोपीचा काही वर्षांमधील प्रवास पाहून तपास यंत्रणाही थक्क झाल्या आहेत. नेमका हा आरोपी कोण आणि त्याने केलंय काय जाणून घेऊयात...

वडील महापालिकेत लिपिक, कुटुंबाचा ज्यूस व्यवसाय अन् तो झाला 94 हजार कोटींचा मालक, पण कसा? नेमकी ही व्यक्ती आहे कोण आणि त्याने केलंय काय? जाणून घ्या सविस्तरपणे...

saurabh chandrakar1/8

₹15000 ते ₹94400 कोटी...

₹15000 पगारावरुन ₹94400 कोटी संपत्तीपर्यंतचा त्याचा प्रवास हादरवणारा असून त्याला ओमानमधून भारतात आणण्यात आलं आहे. ही व्यक्ती आहे कोण त्याने केलंय काय जाणून घ्या सविस्तरपणे...
saurabhchandrakar2/8

3200 हून अधिक बेटिंग पॅनल

देशभरातील स्थानिक ऑपरेटर ग्राहकांना बेटिंग आयडी उपलब्ध करून देत असत. खेळांवर सट्टा लावण्याची सुविधा दिली जात होती. या नेटवर्कमध्ये भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये मिळून 3200 हून अधिक बेटिंग पॅनल कार्यरत असल्याचे तपास यंत्रणांच्या माहितीतून समोर आले.
saurabhchandrakar3/8

बुकचे मुख्य नियंत्रण दुबईतून

सौरभ चंद्राकरच्या महादेव ऑनलाइन बुकचे मुख्य नियंत्रण दुबईतून चालविले जात असल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले. या व्यवसायासाठी फ्रेंचायझी पद्धतीने बेटिंग पॅनल वितरित केले जात होते.
saurabhchandrakar4/8

वडील महापालिकेत लिपिक

सौरभ हा छत्तीसगडमधील भिलाई येथील रहिवासी आहे. त्याचे वडील महापालिकेत लिपिक होते. कुटुंबाचा 'ज्यूस फॅक्टरी' नावाचा ज्यूस व्यवसाय होता. सौरभ या दुकानात काम करीत होता आणि त्याला महिन्याला 15 हजार रुपये वेतन मिळत होते.
saurabhchandrakar5/8

दुबईतील मुख्य कार्यालयातून ऑपरेटरना...

सौरभ चंद्राकरच्या दुबईतील मुख्य कार्यालयातून ऑपरेटरना मास्टर आयडी आणि पासवर्ड दिले जात होते. तपासानुसार, या व्यवहारातील रक्कम विविथ बनावट किंवा इतरांच्या नावावरील बैंक खात्यांमधून फिरविली जात होती. त्यानंतर हवाला आणि अन्य आर्थिक मार्गानी परदेशात पाठविली जात होती.
saurabhchandrakar6/8

महिन्याला केवळ 15 हजार रुपये वेतन

छत्तीसगडमधील भिलाई येथे कुटुंबाच्या ज्यूस सेंटरमध्ये काम करून महिन्याला केवळ 15 हजार रुपये वेतन मिळविणाऱ्या सौरभ चंद्राकर याने काही वर्षातच तब्बल 94 हजार 400 कोटी रुपयांची मालमत्ता महादेव या अवैध अॅपद्वारे कमावल्याची माहिती उघड झाली.
saurabhchandrakar7/8

तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या

सौरभ चंद्राकरच्या या कमाईच्या भल्यामोठ्या आकड्यांमुळे तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या. महादेव या अवैध अॅपद्वारे झालेल्या बेटिंगसंदर्भातील तपासादरम्यान ही माहिती मिळाली आहे.
saurabhchandrakar8/8

200 कोटी रुपयांचे लग्न

सौरभ चंद्राकरचा प्रवास दुबईतील कथित बेटिंग साम्राज्य, 200 कोटी रुपयांचे लग्न आणि परदेशातील मालमत्तांपर्यंत पोहोचला आहे. ओमानमधून त्याचे भारतात प्रत्यार्पण झाल्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले.
TAGS:
crime
india

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
यावेळची सर्वात मोठी बातमी, ज्ञानेश कुमारांची चौकशी होणार; सरकारने दिले आदेश!

यावेळची सर्वात मोठी बातमी, ज्ञानेश कुमारांची चौकशी होणार; सरकारने दिले आदेश!

2

धनत्रयोदशीला शुक्र करणार 5 राशींच्या लोकांना मालामाल! धन, समृद्धी, भौतिक सुखसोयी आणि ऐश्वर्य देणार

3

ODI मध्ये टीम इंडियाची विजयी सुरुवात, कोहलीने ठोकले अर्धशतक!

4

5 जणांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर, शस्त्र हिसकावताना झटापट अन्....

5

मुंबईकरांनो, 'या' भागात फटाके फोडाल तर दिवाळी जाईल तुरुंगात; 2 डिसेंबरपर्यंत आदेश लागू!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.