PF खातेधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ईपीएफओच्या CBTची आज बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
खासगी कंपनीत काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएफ खात्यात शिल्लक ठेवण्याची किमान रक्कमबद्दल मोठा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे.
1/8
PF खातेधारकांना मोठं गिफ्ट!
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची बैठक नवी दिल्लीत बैठक झाली. ज्यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
2/8
PF खातेधारकांना मोठं गिफ्ट!
या बैठकीत किमान रक्कमबद्दल मोठा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी पीएफ खात्यात किमान रक्कम 25 टक्के ठेवणे बंधनकारक होतं.
3/8
PF खातेधारकांना मोठं गिफ्ट!
पण आता यापुढे तुमच्या पीएफ खात्यात किमान रक्कम ही 10 टक्क्यांपर्यंत ठेवली तरी चालणार आहे. यामुळे पीएफ धारकांना दिलासा मिळाला आहे.
4/8
PF खातेधारकांना मोठं गिफ्ट!
उदाहरणात जर तुमच्या पीएफ खात्यात 5 लाख असतील तर तुम्ही 4 लाख काढू शकतात. म्हणजे फक्त एक लाख पीएमध्ये ठेवले तरीही यापुढे चालणार आहे.
5/8
PF खातेधारकांना मोठं गिफ्ट!
त्यासोबत या बैठकीत ईपीएफओच्या सीबीडीनं निवृत्तिबद्दलही महत्त्वाचा निर्णय झाला आहे. त्यानुसार एकाच वेळी पैसे काढण्याऐवजी SWP म्हणजेच सिस्टीमेटिक विड्रॉल प्लाननुसार पैसे काढता येणार आहे.
6/8
PF खातेधारकांना मोठं गिफ्ट!
याचा अर्थ पीएफ खातेदारांना जेव्हा पैशांची गरज असेल तेव्हा त्यांना पैसे काढता येणार आहे. एवढंच नाही तर जेवढे पैसे खात्यात राहतील त्यावर व्याज मिळणार आहे.
7/8
PF खातेधारकांना मोठं गिफ्ट!
गेल्या काही दिवसांपासून ईपीएस पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढसंदर्भात चर्चा होती. पण बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्या ईपीएसमधून 1000 रुपये पेन्शन आहे. ती 7500 करावी अशी मागणी होती.
8/8
PF खातेधारकांना मोठं गिफ्ट!
दरम्यान 16 सप्टेंबरपासून ईपीएफओ वेतन मर्यादा 25 हजार झाल्यामुळे 50 लाखांहून अधिक कर्मचारी ईपीएफओच्या कक्षेत आले आहेत.