• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /Gold Rate Drop: अवघ्या 9 दिवसात सोनं तब्बल ₹20000 ने स्वस्त; खरेदीची योग्य वेळ कोणती?

Gold Rate Drop: अवघ्या 9 दिवसात सोनं तब्बल ₹20000 ने स्वस्त; खरेदीची योग्य वेळ कोणती?

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 22, 2026, 08:01 IST|Updated: Nov 22, 2026, 08:16 IST
joinshare
सोन्यामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. सोनं आणखी कमी होणार? खरेदीची योग्य वेळ कोणती? सविस्तर जाणून घेऊया.

सोन्यातील घसरणीमुळे ग्राहकांसह गुंतवणूकदारांचेही लक्ष सोने-चांदीच्या बाजाराकडे लागले आहे.

Gold Rate Down1/10

Gold Rate Drop: अवघ्या 9 दिवसात सोनं तब्बल ₹20000 ने स्वस्त; खरेदीची योग्य वेळ कोणती?

लग्नसराईचा हंगाम सुरू होत असतानाच सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या आठवडाभरात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅममागे जवळपास ११ हजार रुपयांनी, तर चांदीचे दर प्रतिकिलोमागे सुमारे २० हजार रुपयांनी कमी झाले आहेत.
चांदीचा प्रति किलो दर2/10

सोने-चांदीच्या बाजाराकडे लक्ष

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. या घसरणीमुळे ग्राहकांसह गुंतवणूकदारांचेही लक्ष सोने-चांदीच्या बाजाराकडे लागले आहे.
 २४ कॅरेट सोन्याचा दर3/10

आठवडाभरात सोन्याचे दर ११ हजारांनी घसरले

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (IBJA) आकडेवारीनुसार, १६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर १६ नोव्हेंबरला प्रति १० ग्रॅम १ लाख ३४ हजार ३८० रुपये होता. तो घसरून १ लाख २३ हजार ५८४ रुपयांवर आला. म्हणजेच आठवडाभरात जवळपास १० हजार ८०० रुपयांची घट झाली आहे.
आजचे सोने-चांदीचे भाव4/10

चांदीच्या दरातही जवळपास २० हजारांची घसरण

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाली आहे. १६ नोव्हेंबरला एक किलो चांदीचा दर १ लाख ६९ हजार २८० रुपये होता. २० नोव्हेंबरपर्यंत हा दर घसरून १ लाख ५० हजार ६५० रुपयांवर आला. म्हणजेच एका आठवड्यात चांदी जवळपास १८ हजार ६३० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
 सोन्याचा आजचा भाव5/10

२२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर किती?

२० नोव्हेंबरच्या IBJA आकडेवारीनुसार, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख १३ हजार २०३ रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर ९२ हजार ६८८ रुपये होता. त्यामुळे दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी सोन्याच्या दरातील घसरण महत्त्वाची ठरली आहे.
Gold Price Crash November 20266/10

विक्रमी उच्चांकावरून सोन्याची मोठी घसरण

जानेवारी २०२६ मध्ये सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ९३ हजार रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता. त्यानंतर दरात मोठी घसरण झाली. सध्याच्या पातळीशी तुलना करता सोन्याचा दर विक्रमी उच्चांकापेक्षा जवळपास ७० हजार रुपयांनी कमी झाला आहे. चांदीच्याही दरात मोठी घट झाली आहे.
Silver Price Per Kg7/10

चांदीचा दर विक्रमी उच्चांकापेक्षा २.७ लाखांनी कमी

जानेवारीमध्ये चांदीचा दर प्रतिकिलो ४ लाख २० हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. आता तो सुमारे १ लाख ५० हजार रुपयांवर आला आहे. म्हणजेच विक्रमी पातळीच्या तुलनेत चांदी जवळपास २ लाख ७० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Silver Price Per Kg8/10

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाचा परिणाम

सोन्या-चांदीच्या घसरणीमागे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य व्याजदरवाढीचा मोठा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. डिसेंबरमध्ये अमेरिकेची मध्यवर्ती बँक व्याजदरात ५० बेसिस पॉइंट्सची वाढ करू शकते, अशी बाजारात चर्चा आहे. व्याजदर वाढल्यास डॉलर आणि अमेरिकी सरकारी रोखे गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक ठरू शकतात. त्यामुळे सोन्या-चांदीतील गुंतवणूक कमी होण्याची शक्यता आहे.
24 Carat Gold Rate9/10

कच्च्या तेलाच्या किमतींचाही दबाव

कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल ९० डॉलरच्या वर राहिल्याने महागाईची चिंता कायम आहे. महागाई, डॉलरमधील मजबुती आणि जागतिक आर्थिक परिस्थितीतील अनिश्चितता यांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या बाजारावर होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांकडून सोने आणि चांदीतील गुंतवणूक काढून घेण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे.
Gold Silver Price Today10/10

सोने-चांदीचे दर वाढणार की आणखी घसरणार?

बाजारातील काही तज्ज्ञांच्या मते, सोन्याचा संभाव्य तळ १ लाख १५ हजार ते १ लाख ३० हजार रुपये प्रति १० ग्रॅम या दरम्यान असू शकतो. मोठ्या घसरणीनंतर टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा सल्लाही काही बाजार विश्लेषक देत आहेत. दुसरीकडे, गोल्डमन सॅक्सच्या मते अल्पकालीन काळात सोन्याच्या किमतींवर दबाव राहू शकतो. मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सोने आणि चांदीकडे पाहिले जात आहे. (Desclaimer: हा लेख माहितीसाठी आहे. झी 24 तास कोणताही गुंतवणुकीय सल्ला देत नाही. भविष्यातील दर निश्चित नसल्याने गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या.)
TAGS:
Gold Price

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.