• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /फोटो
  • /भारतातील कोट्यवधी पेन्शनर्ससाठी गुड न्यूज! एका सेल्फीने मिळेल जीवन प्रमाणपत्र; प्रक्रियापण खूपच सोपी

भारतातील कोट्यवधी पेन्शनर्ससाठी गुड न्यूज! एका सेल्फीने मिळेल जीवन प्रमाणपत्र; प्रक्रियापण खूपच सोपी

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 23, 2026, 20:37 IST|Updated: Nov 23, 2026, 20:47 IST
joinshare
पेन्शनधारकांना आता स्मार्टफोनवरून फेस ऑथेंटिकेशनद्वारे घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येणार आहे.

प्रक्रिया आणि पर्यायी सुविधेविषयी जाणून घ्या.

Pensioners selfie1/8

भारतातील कोट्यवधी पेन्शनर्ससाठी गुड न्यूज! एका सेल्फीने मिळेल जीवन प्रमाणपत्र; प्रक्रियापण खूपच सोपी

पेन्शनधारकांना पेन्शन नियमित सुरू राहण्यासाठी दरवर्षी आपण हयात असल्याचे प्रमाणपत्र म्हणजेच जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) सादर करावे लागते. यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिकांना बँक किंवा संबंधित कार्यालयात जावे लागते. मात्र, आता केंद्र सरकारच्या 'जीवन प्रमाण' सुविधेमुळे हे काम घरबसल्या करता येते.
Pensioners Good NEws 2/8

पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज

स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशनद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येते. विशेषतः ज्येष्ठ, आजारी आणि दिव्यांग पेन्शनधारकांसाठी ही सुविधा उपयुक्त ठरू शकते.
जीवन प्रमाण ॲप3/8

सेल्फीद्वारे जीवन प्रमाणपत्र कसे तयार होते?

ही प्रक्रिया केवळ फोटो काढून अपलोड करण्यापुरती मर्यादित नाही. पेन्शनधारकाच्या चेहऱ्याची आधारमधील माहितीशी पडताळणी केली जाते. ओळख यशस्वीरीत्या निश्चित झाल्यानंतर डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार होते. त्याला एक स्वतंत्र 'प्रमाण आयडी' दिला जातो. ही माहिती संबंधित पेन्शन वितरण संस्थेला डिजिटल पद्धतीने उपलब्ध होते.
ऑनलाईन जीवन प्रमाणपत्र4/8

कोणते अॅप डाउनलोड करावे?

या सुविधेसाठी स्मार्टफोनमध्ये दोन अधिकृत अॅप डाउनलोड करावे लागतात. जीवन प्रमाण अॅप आणि आधार फेस आरडी अॅप डाउनलोड केल्यानंतर आधार क्रमांक, नाव, मोबाइल क्रमांक, पेन्शन पेमेंट ऑर्डर (PPO) क्रमांक, बँक खाते आणि पेन्शन वितरण संस्थेची माहिती भरावी लागते. त्यानंतर संमती देऊन मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्यासमोर चेहरा स्कॅन करावा लागतो. या प्रक्रियेसाठी स्वतंत्र फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनरची आवश्यकता नाही.
Pensioners Life Certificate5/8

कोणत्या पेन्शनधारकांना लाभ घेता येतो?

केंद्र आणि राज्य सरकारी पेन्शनधारकांसह संबंधित सरकारी संस्थांशी जोडलेल्या पेन्शनधारकांना ही सुविधा उपलब्ध आहे. ईपीएस-95 अंतर्गत पेन्शन घेणाऱ्यांनाही संबंधित संस्था जीवन प्रमाण प्रणालीशी जोडलेली असल्यास डिजिटल प्रमाणपत्राचा लाभ घेता येतो. केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना साधारणपणे नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. 80 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या पेन्शनधारकांना 1 ऑक्टोबरपासून प्रमाणपत्र सादर करता येते.
Aadhaar Face Authentication6/8

प्रमाणपत्र नाकारले जाऊ नये म्हणून काय काळजी घ्याल?

आधार क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक खाते आणि पेन्शन वितरण संस्थेची माहिती अचूक भरणे महत्त्वाचे आहे. संरक्षण किंवा दूरसंचार क्षेत्रातील काही पेन्शनधारकांची पेन्शन वितरण व्यवस्था SPARSH किंवा SAMPANN सारख्या पोर्टलवर स्थलांतरित झाली असल्यास संबंधित जुनी बँक निवडल्यामुळे प्रमाणपत्र नाकारले जाऊ शकते. प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर त्याची प्रमाण आयडी जपून ठेवावी आणि संबंधित बँक किंवा विभागाने ते स्वीकारले आहे की नाही, हे तपासावे.
Jeevan Pramaan App7/8

फेस स्कॅन अयशस्वी झाल्यास काय करावे?

कमी प्रकाश, इंटरनेटची समस्या किंवा कॅमेऱ्यासमोर चेहरा योग्य पद्धतीने न ठेवल्यामुळे फेस ऑथेंटिकेशन अयशस्वी होऊ शकते. अशा वेळी जवळच्या बँक शाखेत, पोस्ट ऑफिसमध्ये किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (CSC) जाऊन बायोमेट्रिक पद्धतीने प्रमाणपत्र तयार करता येते. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या (IPPB) माध्यमातून घरपोच डिजिटल जीवन प्रमाणपत्राची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय, पारंपरिक पद्धतीने कागदी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचा पर्यायही कायम आहे.
Life Certificate Online8/8

स्टेटस तपासणे आवश्यक

महाराष्ट्रातील केंद्र आणि राज्य सरकारी पेन्शनधारकांनी आपली पेन्शन कोणत्या विभागामार्फत किंवा बँकेमार्फत वितरित होते, यानुसार योग्य पर्याय निवडावा. डिजिटल प्रमाणपत्र तयार झाले म्हणजे ते संबंधित विभागाने स्वीकारलेच आहे असे समजू नये; त्याचा स्टेटस तपासणे आवश्यक आहे.
TAGS:
Government Schemes
india

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
बीड: भाजपा नगरसेवकाच्या मुलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू; रेसिंगचा कुटुंबीयाचा दावा; BJP नेत्याने दिला व्हिडीओ पुरावा

बीड: भाजपा नगरसेवकाच्या मुलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू; रेसिंगचा कुटुंबीयाचा दावा; BJP नेत्याने दिला व्हिडीओ पुरावा

2

33 वर्षीय नितीन वाघमारेंच्या मृत्यू प्रकरणी मोठी कारवाई; नोबल हॉस्पिटलला प्रशासनाने ठोकलं टाळं

3

नाव न घेता पृथ्वी शॉने युवराज सिंहच्या वडिलांना दिली वॉर्निंग, नेमकं काय घडलं?

4

राजकारणातील मोठी घडामोड! समाजवादीचा काँग्रेसला मेसेज; 'आम्ही रिस्क घेऊ शकत नाही', 15 मिनिटांत संपली बैठक, नेमकं काय घडलं?

5

'न्यायाधीशांनी 'रॉबिन हूड' किंवा 'बाहुबली' बनण्याची गरज नाही': सर्वोच्च न्यायालयाने का फटकारले?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.