सोन्याची झळाळी कमी झाली नसली तरी सोन्याची मागणी भारतात कमी झाली आहे. नेमकी या मागील कारण काय? याचा दागिने खरेदीवर कसा परिणाम झाला आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती...
भारतीयांना सोन्याची किती हौस आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र आता सोन्याची मागणी भारतात कमी झाली आहे. या मागची कारणं कोणती आणि नक्की सोने बाजारात काय सुरु आहे पाहूयात...
1/8
दागिने खरेदीचे ट्रेंड बदलले
सोन्याचे दर कमी होत असले तरी सोने खरेदीकडे भारतीयांना का पाठ फिरवल्याचं चित्र दिसतंय जाणून घ्या सविस्तरपणे...
2/8
तिमाहीत वार्षिक तुलनेत 29 टक्क्यांची घट
सोन्याच्या चढ्या किमतीसह, उच्च आयात शुल्क आणि मर्यादित खरेदीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आवाहन यामुळे देशातील सोन्याच्या मागणीत जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत वार्षिक तुलनेत 29 टक्क्यांची घट झाली. तिमाहीत सोन्याची मागणी 162.5 टनांवर मर्यादित राहिली असली, संपूर्ण 2026 वर्षात ती 625 ते 675 टनांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज जागतिक सुवर्ण परिषदेने (डब्ल्यूजीसी) मंगळवारी व्यक्त केला.
3/8
मागणीत घट झाली असली, तरी...
डब्ल्यूजीसीच्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या 'तिसरी तिमाही 2026 : सोन्याच्या मागणीचा कल' या अहवालानुसार, 2025 मधील याच
तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी 229.8 टन होती. मागणीत घट झाली असली, तरी मूल्याच्या दृष्टीने मात्र तीन टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. जुलै ते सप्टेंबरदरम्यान सोने खरेदीचे मूल्य 2 लाख 41 हजार 900 कोटी रुपयांवर पोहोचले. गेल्या वर्षी याच काळात ते 2 लाख 35 हजार 90 कोटी रुपये होते.
4/8
यंदा आणि गेल्या वर्षीचा भाव
या तिमाहीत सोन्याचा सरासरी भाव दहा ग्रॅमसाठी 1,48,891 रुपये होता. गेल्या वर्षी याच काळात हा भाव दहा ग्रॅमसाठी 1,02,287 रुपये होता. हे दर आयात शुल्क आणि वस्तू व सेवा कर वगळून आहेत. चढ्या किमतींचा ग्राहकांच्या खरेदीच्या निर्णयांवर परिणाम झाला असला, तरी सोन्याच्या मागणीतील जोर कायम आहे.
5/8
सोन्याला दीर्घकालीन मूल्याच्या दृष्टीने प्राधान्य
ग्राहकांनी खरेदीचे प्रमाण आणि परवडणारी किंमत यांचा समतोल साधत सोन्याला दीर्घकालीन मूल्याच्या दृष्टीने प्राधान्य दिले आहे, असे डब्ल्यूजीसीचे भारतातील प्रादेशिक मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन जैन यांनी सांगितले. तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे काही ग्राहकांनी पुढे ढकललेली खरेदी केली.
6/8
ग्राहकांच्या दागिने खरेदीवर परिणाम
सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या दागिने खरेदीवर परिणाम झाला आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत भारतातील सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीमध्ये घट झाली आहे.
7/8
खरेदी करण्याची इच्छा कायम असली, तरी...
जागतिक सुवर्ण परिषदेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. सोन्याची खरेदी करण्याची इच्छा कायम असली, तरी वाढलेल्या किमतींमुळे ग्राहकांना खरेदीचे प्रमाण कमी करावे लागत आहे.
8/8
दोन ट्रेण्ड बदलले
जुन्या सोन्याच्या बदल्यात नवीन दागिन्यांकडे कल वाढल्याचं दिसत आहे. तसेच तोळ्याने सोनं घेण्याऐवजी ग्रॅमवर भर देत खरेदी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक)