दृष्काळग्रस्त भागातील कोणत्या विद्यार्थ्यांना फीसवलत दिली जाणार आणि कोणाला नाही याची नियमावली तसेच अटी, शर्थी जाहीर करण्यात आल्या आहेत. नेमकं काय म्हटलं आहे यामध्ये जाणून घ्या...
सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना फीसवलत मिळणार नाहीये. नेमकी कोणाला ही सवलत दिली जाणार आणि कोणाला नाही ते पाहूयात...
1/8
या विद्यार्थ्यांनी फी सवलत नाहीच
राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत नवीन अटी आणि नियम जाहीर करण्यात आलेत. कोणाला मिळणार फी सवलत आणि कोणाला नाही ते यामधून स्पष्ट केलंय. याबद्दलच जाणून घेऊयात...
2/8
यांना शुल्कमाफी मिळणार नाही
नव्या अटी व शर्तींनुसार बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्याच परीक्षेला दुसऱ्यांदा बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शुल्कमाफी मिळणार नाही.
3/8
एकूण किती खर्च अपेक्षित?
या सवलतीसाठी सुमारे 20 लाख 28 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
4/8
या पाल्यांना मिळणार नाही लाभ
तसेच शहरात नोकरी वा व्यवसाय करणाऱ्या व गावी शेतजमीन असणाऱ्यांच्या पाल्यांनाही हा फी सवलतीचा लाभ मिळणार नाही.
5/8
कोणाला शुल्क माफ करणार?
दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत कला परिसंस्थांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे 2026-27 मधील परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
6/8
अटी व शर्ती जाहीर
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा दिलासा मिळणार असला, तरी या सवलतीसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून काही अटी व शर्ती जाहीर करण्यात आल्या आहेत.
7/8
मागासवर्गीय वा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसंदर्भातही निर्णय
मागासवर्गीय वा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या फी सवलतीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून याबद्दलही अट घालण्यात आलीये.
8/8
50 टक्के शुल्कमाफी
महाडीबीटी पोर्टलवरील शासकीय योजनांमधून मागासवर्गीय वा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना यापूर्वी 50 किंवा 100 टक्के परीक्षा शुल्कमाफी मिळाली असल्यास, त्यातील 50 टक्के सवलत मिळालेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित 50 टक्के शुल्कमाफी देण्यात येईल.