हायलो ओपन 2026 पुरुष एकेरी फायनलच्या सामन्यामध्ये लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध सामना जिंकून रचला इतिहास.
भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने हिलो ओपन सुपर 500 चे विजेतेपद पटकावले आहे. या विजयासह, ती हिलो ओपनचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली आहे.
1/9
पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू
25व्या क्रमांकावरील डॅनिश खेळाडूला अवघ्या 39 मिनिटांत 21-12, 21-14 असे पराभूत केले. या विजयासह, सिंधू हाय-लो ओपन सुपर 500 विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरली. या विजयामुळे सिंधूच्या खात्यात 9200 रँकिंग गुणांची भर पडली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
दोन वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने रविवारी (1 नोव्हेंबर) जर्मनीमध्ये झालेल्या हायलो ओपन सुपर 500 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या लाइन होजमार्क क्येरफेल्डला सरळ गेममध्ये पराभूत करून विजेतेपद पटकावले. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/9
पीव्ही सिंधूने ऐतिहासिक कामगिरी
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पुन्हा एकदा इतिहास रचला आहे, हायलो ओपन सुपर 500 च्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल नावावर केले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/9
जोनाथन क्रिस्टीविरुद्ध जिंकला अंतिम सामना
लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध हायलो ओपन 2026 च्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना जिंकून इतिहास रचला आणि कोणत्याही गटात दोनदा विजेतेपद पटकावणारा तो पहिला भारतीय ठरला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/9
सिंधूचे दुसरे बीडब्ल्यूएफ विजेतेपद
या हंगामातील हे तिचे दुसरे बीडब्ल्यूएफ विजेतेपद आहे. यापूर्वी, सिंधूने जुलैमध्ये जपान ओपनचे विजेतेपदही जिंकले होते. अंतिम सामन्यात, जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने सुरुवातीपासूनच उत्कृष्ट खेळ करत ही ऐतिहासिक कामगिरी केली. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/9
लक्ष्य सेनची ऐतिहासिक कामगिरी
आज रात्रीच्या अंतिम सामन्यात, 25 वर्षीय लक्ष्य सेनने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने इतिहासात आपले नाव कोरले. लक्ष्यने इंडोनेशियाच्या गतविजेत्या जोनाथन क्रिस्टीला 21-17, 21-10 असे पराभूत करून हा पराक्रम साधला. हे लक्ष्यचे या वर्षातील पहिले BWF विजेतेपद आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/9
दुसरे हिलो ओपन विजेतेपद
या विजयासह लक्ष्य सेनने इतिहास रचला. हे लक्ष्य सेनचे केवळ दुसरे हिलो ओपन विजेतेपदच नाही, तर तो कोणत्याही गटात दोनदा हिलो ओपन विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीयही ठरला आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/9
पुरुष एकेरीचा अंतिम सामना जिंकला
रविवारी लक्ष्य सेनने इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध हायलो ओपन 2026 च्या पुरुष एकेरीचा अंतिम सामना जिंकला. त्याने पहिला गेम 21-17 ने जिंकला आणि त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये क्रिस्टीचा सहज पराभव केला. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
9/9
हायलो ओपन 2026 चॅम्पियन
भारताची स्टार महिला बॅटमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि टीम इंडिया पुरुष बॅटमिंटनपटू लक्ष्य सेन यांची ऐतिहासिक कामगिरी पाहायला मिळाली. या मध्ये त्यांनी कशी कामगिरी केली यासंदर्भात वाचा.