अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरू हे दोघे लवकरच आई बाबा होणार आहे, त्यांच्या घरी लवकरच बाळ येणार आहे, अभिनेत्रीने तिच्या डोहाळे जेवळाचे फोटो काही शेअर केले आहे.
अभिनेत्री समंथा तिच्या गरोदरपणाच्या प्रवासाचा आनंद घेत आहे आणि सोशल मीडियावर चाहत्यांसोबत नियमितपणे फोटो शेअर करत असते. आता तिने तिच्या डोहाळेजेवणाचे काही क्षणचित्रे शेअर केली आहेत.
1/8
अभिनेत्री सामंथा प्रभूचे डोहाळे जेवण
सामंथा रुथ प्रभूने बुधवारी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये तिने डोहाळेजेवणाचे फोटो शेअर केले आहेत. संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. या फोटोमध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
2/8
अभिनेत्री सामंथा प्रभूचे डोहाळे जेवण
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि प्रतिभावान अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूच्या आयुष्यात आनंदाचा एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. वयाच्या 39 व्या वर्षी आई होणारी सामंथा सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांचा अनुभव घेत आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
3/8
अभिनेत्री सामंथा प्रभूचे डोहाळे जेवण
पती राज निदिमोरू सोबतचे तिचे आनंदी फोटो आधीच चाहत्यांची मने जिंकत होते, पण आता कुटुंबाने चिमुकल्या पाहुणीसाठी आयोजित केलेल्या विशेष पूजेच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
4/8
अभिनेत्री सामंथा प्रभूचे डोहाळे जेवण
डोहाळेजेवणाचा सोहळा सर्व विधींसह पारंपरिक पद्धतीने पार पडला. घरातील वडीलधाऱ्यांनी होणाऱ्या बाळासाठी शुभेच्छा व आशीर्वाद दिले. राज आणि सामंथा एकत्र बसून विधी पूर्ण करताना दिसत आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
5/8
अभिनेत्री सामंथा प्रभूचे डोहाळे जेवण
सामंथाने फोटोंना 'आम्ही' असे कॅप्शन दिले आहे, सोबत एक पांढऱ्या रंगाचा हार्ट इमोजीही जोडला आहे. फोटोंमध्ये, सामंथा हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे, तर इतर लोक तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देत आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
6/8
अभिनेत्री सामंथा प्रभूचे डोहाळे जेवण
समंथाने 9 नोव्हेंबर रोजी स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये ती तिचे बेबी बंप दाखवताना दिसली होती. त्या फोटोला 'हा फोटो माझे मॅटर्निटी शूट समजा' असे कॅप्शन दिले होते. राज आणि समंथा यांचे लग्न 1 डिसेंबर 2025 रोजी झाले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
7/8
अभिनेत्री सामंथा प्रभूचे डोहाळे जेवण
सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये वयस्कर महिला, नातेवाईक आणि जवळच्या मित्रमैत्रिणींनी या विशेष पूजेला उपस्थित राहून समंथा आणि तिच्या होणाऱ्या बाळावर प्रेम आणि आशीर्वादांचा वर्षाव केला. या सोहळ्याचे फोटो समोर आल्यानंतर, चाहते याला डोहाळेजेवण (बेबी शॉवर) म्हणत आहेत. फोटो सौजन्य - सोशल मिडिया
8/8
अभिनेत्री सामंथा प्रभूचे डोहाळे जेवण
हा विशेष प्रसंग केवळ विधींपुरता मर्यादित नव्हता, तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र पूजा, पठण आणि भजन-कीर्तनही केले. शीतलने सांगितले की, घरातील पूजास्थळी एकत्र बसून मंत्रोच्चार करणे आणि भजन गाणे हे नेहमीच त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग राहिले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया