पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या वाढीव कामादरम्यान इंदापूर तालुक्यातील बिजवडीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक अपघात झाल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
1/7
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना!
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या वाढीव कामादरम्यान मातीचा मोठा ढिगारा अचानक कोसळला. त्यानंतर परिसरात एकच धावपळ सुरु झाली.
2/7
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना!
मिळालेल्या माहितीनुसार या ढिगाऱ्याखाली चार ते पाच मजूर अडकल्याची भीती वर्तवण्यात आली.
3/7
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना!
स्थानिकांकडून मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून दोन मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. मात्र एका मजुराचा मृत्यू झाला आहे.
4/7
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना!
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना ही धक्कादायक घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली.
5/7
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना!
इंदापूर तालुक्यातील बिजवडी इथे घटना घडल्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे.
6/7
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना!
मिळालेल्या माहितीनुसार बाहेर काढण्यात आलेल्या मजुरांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही.
7/7
पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी दुर्घटना!
या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित अधिकारी, सरकारी यंत्रणा व माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने बचावकार्यात सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता ठाकरेंनी दिली आहे.