• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /सोनं खरेदी करण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट पाहू नका, अमेरिकेतील त्या घटनेने सोनं होतंय स्वस्त, कारण जाणून घ्या!

सोनं खरेदी करण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट पाहू नका, अमेरिकेतील त्या घटनेने सोनं होतंय स्वस्त, कारण जाणून घ्या!

सोन्याच्या दरात किती वाढ होईल, सोनं स्वस्त होणार का? दिवाळीत सोन्याचे दर काय असतील? जाणून घेऊयात आजचा हा सविस्तर आढावा

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 30, 2026, 12:31 PM IST|Updated: Oct 30, 2026, 12:32 PM IST
joinshare
सोनं खरेदी करण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट पाहू नका, अमेरिकेतील त्या घटनेने सोनं होतंय स्वस्त, कारण जाणून घ्या!
Image Credit: Gold Price Explained

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
App Base वाहन सेवा अधिक सुरक्षित, परवडणारी होणार; फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक! नेमके काय आदेश दिलेत एकदा वाचाच

App Base वाहन सेवा अधिक सुरक्षित, परवडणारी होणार; फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक! नेमके काय आदेश दिलेत एकदा वाचाच

2

सोनं खरेदी करण्यासाठी दिवाळीपर्यंत वाट पाहू नका, अमेरिकेतील त्या घटनेने सोनं होतंय स्वस्त, कारण जाणून घ्या!

3

सहावी IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईचा मास्टरस्ट्रोक! तिघांच्या जागी चौघे आले; पडद्यामागे MI चं चाललंय काय?

4

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येणार? संजय राऊतांनी एका वाक्यात संपवला विषय; म्हणाले, 'आम्ही दूर आहोत ते...'

5

राजकीय उलथापालथ, आंदोलनानंतर महिलांची सत्ता येणार अन् 7 दिवसात पाऊस कोसळणार, फरांडे बाबांची भाकणूक चर्चेत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Gold Price Explained: दिवाळीत मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं. धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन खरेदीची परंपरा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे वाढत चालले दर यामुळं ग्राहकांना सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न पडत आहे. आता जरी सोन्याचे दर गडगडले असले तरी दिवाळीत सोनं पुन्हा महाग होईल का? हा प्रश्न केला जात आहे.  याआधी सोनं 2 लाखांचा टप्पा पार करेल, असं भाकित करण्यात आलं होतं. मात्र जानेवारीत सोनं 1.75 लाखांवर पोहोचले. त्यानंतर आता सोन्याचा भाव 1.5 लाखांवर पोहोचले आहे. दिवाळीनंतर लग्नाचा सीझन सरू होईल. त्यामुळं तुम्ही देखील सोनं खरेदी करण्याचा विचार करताय तर दिवाळीपर्यंत वाट पाहू नका.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर स्थिर ठेवल्याने दिवाळीपूर्वी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. आगामी काही आठवडे सोन्याचे दर स्थिर राहू शकतात, असा अंदाज आहे. फेडरल रिझर्व्हेने बुधवारी प्रमुख 3.75 ते 4 टक्के या पातळीवर कायम ठेवले. बाजाराने यापूर्वीच या निर्णयाचा अंदाज व्यक्त केला होता. सणासुदीच्या काळात सोन्याची खरेदी वाढल्याने देशांतर्गंत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांमधील तफावत कमी झाली आहे. देशांतर्गंत बाजारातील सोन्याचे दर आता आंतरराष्ट्रीय दरांपेक्षा प्रति औंस सुमारे दोन डॉलरने कमी आहेत.

सणासुदीला सोनं खरेदी करावं का?

अमेरिकेच्या रिझर्व्ह बँकेने, महागाईच्या भीतीमुळे व्याजदर जास्त ठेवले आहेत आणि त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तेलाच्या किमती आधीच जास्त आहेत, ज्यामुळे महागाईची भीती आणखी वाढत आहे. तसंच धनत्रयोदशी जवळ येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सोन्याचे दर हे सर्व इराण युद्धावर अवलंबून असेल. सध्याची परिस्थिती लवकर संपेल असे वाटत नाही. बहुतेक अर्थतज्ज्ञ आणि सर्वेक्षणांनुसार, अमेरिकेच्या 10-वर्षीय बॉण्ड यील्ड्स किमान 5-6 महिने 5% पेक्षा जास्त राहतील. काहींच्या मते, जर महागाई नियंत्रणात राहिली नाही, तर ते आणखी जास्त काळ जास्त राहू शकतात.

सोन्याचे भाव का घसरताहेत?

जानेवारीत सोन्याचा दर उच्चांकी स्तरावर पोहोचला होता. साधारण 10 ग्रॅम सोनं 1.75 लाखांवर पोहोचल होतं. पण ऑक्टोबर अखेरीस सोन्याच्या दरांत 1.43 लाखांच्या आसपास घट झाली आहे. म्हणजेच साधारण 20 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे अमेरिकन बाँडवरील उच्च परतावा.

यूएस बाँड म्हणजे काय?

यूएस बाँड म्हणजे काय आणि त्याचे उत्पन्न (यील्ड) किती असते? बाँड म्हणजे कर्जाची पावती. जेव्हा तुम्ही कोणाला पैसे उधार देता, तेव्हा ते तुम्हाला एक पावती देतात, ज्यावर नमूद केलेले असते की त्यांनी एवढी रक्कम उधार घेतली आहे आणि एवढे व्याज देण्याचे मान्य केले आहे. जेव्हा सरकार बाँड जारी करते, तेव्हा याचा अर्थ असा होतो की सरकार तुमच्याकडून पैसे उधार घेत आहे. जेव्हा यूएस सरकार हे पैसे उधार घेते आणि त्या बदल्यात बाँड देते, तेव्हा त्यांना यूएस गव्हर्नमेंट बाँड्स म्हणतात. बाँडमध्ये असे नमूद केलेले असते की ठराविक वर्षांनंतर संपूर्ण रक्कम परत केली जाईल आणि या दरम्यान सरकार ठराविक दराने व्याज देईल. उत्पन्न (यील्ड) म्हणजे त्या बाँडवरील वार्षिक व्याज किंवा परतावा. उदाहरणार्थ, जर दहा वर्षांच्या यूएस बाँडचे उत्पन्न 5% असेल, तर याचा अर्थ असा की जर तुम्ही सरकारला दहा वर्षांसाठी $100,000 कर्ज दिले, तर तुम्हाला दरवर्षी $5,000 व्याज मिळेल आणि दहा वर्षांनंतर मुद्दल परत मिळेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Gold Price
Silver Price
india